प्रमोद आहेरशिर्डी : आषाढीला लाखो भाविकांची गर्दी होऊनही पंढरपुरात प्रत्येक वारकऱ्याला पांडुरंगाचा पदस्पर्श घडतो. यामुळे त्यांचा सर्व शिणभाग जातो़ शिर्डीत मात्र काही हजारांची गर्दी असतानाही सामान्य भाविकाला साईसमाधी तर सोडा चौथाºयालाही हस्तस्पर्श करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक साईभक्तालाही पदस्पर्श दर्शनाची आस आहे.अलीकडच्या काळात शिर्डीत अनेक सुविधा निर्माण झाल्या़ पूर्वी अनेक अडचणींचा सामना करूनही भाविक मनासारखे दर्शन घडल्याने पुन्हा येण्याचा संकल्प करून आनंदाने शिर्डी सोडत़ ज्यासाठी भाविक सगळा त्रास सोसतो ते दर्शनही त्याला मनासारखे मिळत नाही. सुरक्षा रक्षकांच्या ‘चलो आगे’चा जप ऐकत मूर्तीला हात जोडून तो केव्हा बाहेर पडतो, हे भाविकालाही कळत नाही़ व्हीआयपी भाविकांना दर्शनासाठी समाधीची काच काढली जाते. समाधीवर माथा टेकविण्याची संधी दिली जाते. सामान्य भाविकाला मात्र या काचांमुळे समाधी तर दूरच चौथाºयालाही हात लावता येत नाही़अनेक जण समाधीवर माथा टेकवला की दूर होत नाहीत. त्यामुळे दर्शन रांग पुढे सरकत नाही, असे सांगितले जाते़ सुरक्षा रक्षकांचा थोडा त्रास कमी करण्यासाठी भाविकांना समाधी स्पर्शापासून वंचित ठेवणे योग्य नाही़ काचे ऐवजी सव्वा फुटाची जाळी लावली तर वरील बाजूने समाधी दिसत नाही. किमान चौथाºयाला तरी हात लावून दर्शन घेता येईल़मंदिरात सुरक्षा रक्षकांना खाकी ऐवजी चोपदाराचे पारंपरिक गणवेश दिले तर रक्षकांमध्ये आपोआप नम्रता येईल. भाविकांनाही त्यांच्याविषयी आदर वाटल्याने परस्परांमध्ये सुसंवाद होईल, मात्र याबाबत काही होत नाही़साईदर्शनाला येणाºया भाविकांची वाहने तपासणीच्या नावाखाली अडवून अनेक ठिकाणी पोलिसांकडून आर्थिक व मानसिक छळवणूक होते. भाविकांची चेनस्रेचिंग, पाकीटमारी करणारे, चुकीची माहिती देऊन पूजेच्या वस्तू खरेदीत किंवा रूम घेताना अव्वाच्या सव्वा कमिशन उकळणारे, जादा पैसे घेऊनही भाविकांशी वाद घालणारे, प्रसंगी मारहाणही करणारे खासगी प्रवासी, वाहतूकदार, दुकानदार कमी नाहीत. (उत्तरार्थ).नगर पंचायत, ग्रामस्थांकडून सहकार्याची भाविकांना अपेक्षासाईनगरीत येणाºया भाविकांवर शिर्डीतील हजारो लोकांचे संसार उभे आहेत़ त्यामुळे भाविकांना योग्य सन्मान देणे व नम्रतेने बोलण्याबरोबच त्यांचे येथील वास्तव्य व दर्शन आनंददायी होणे गरजेचे आहे.त्यांनी पुन्हा पुन्हा यावे, यासाठी संस्थान, नगरपंचायत, ग्रामस्थांकडून संयुक्त प्रयत्न व्हावेत़, अशी भाविकांची अपेक्षा आहे. शहरात स्वच्छतेचीही गरज असल्याचे भाविकांचे मत आहे.
पदस्पर्श दर्शनाची साईभक्तांना आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:03 AM