लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : इस्त्रायल देशाचे भूदलप्रमुख (चीफ आॅफ ग्राऊंड फोर्सेस) मेजर जनरल याकोब बराक यांनी नगर येथील एसीसी अॅण्ड एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेला भेट देत येथील प्रशिक्षण पद्धती व अत्याधुनिक युद्धतंत्राची माहिती घेतली.नगरपासून चार किलोमीटर अंतरावर जामखेड रस्त्यावर आर्मर्ड कोर सेंटर अॅण्ड स्कूल (एसीसी अॅण्ड एस) ही लष्करी प्रशिक्षण संस्था आहे. देशातील प्रमुख लष्करी प्रशिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या या संस्थेस मित्रदेशाचे अनेक लष्करी अधिकारी, तसेच शिष्टमंडळ भेट देत असतात. याच पार्श्वभूमीवर इस्त्रायलचे भूदलप्रमुख मेजर जनरल याकोब बराक व त्यांच्या सहा सदस्यांनी बुधवारी (दि. १) आर्मर्ड कोअर सेंटरला भेट दिली. एसीसी अॅण्ड एसचे कमांडंट मेजर जनरल नीरज कपूर यांनी त्यांचे स्वागत केले. संस्थेच्या स्थापनेपासून आतापर्यंत राहिलेले संस्थेचे योगदान, तसेच प्रशिक्षण पद्धतीची माहिती कपूर यांनी शिष्टमंडळाला दिली. याशिवाय आर्मर्ड कोअरमध्ये जवानांना दिले जाणारे अत्याधुनिक युद्ध प्रशिक्षण, रणगाडे, तसेच इतर शस्त्रास्त्रांचे वैशिष्ट्यही बराक यांच्या शिष्टमंडळाने जाणून घेतले. याशिवाय शिष्टमंडळाने प्रसिद्ध रणगाडा संग्रहालयालाही भेट देत पाहणी केली. एसीसीकडून लष्कराला दिल्या जाणाºया उत्कृष्ट प्रशिक्षणाबद्दल बराक यांनी येथील अधिकाºयांचे कौतुक केले. मेजर जनरल नीरज कपूर यांनी बराक यांना रणगाड्याची प्रतिकृती भेट देत त्यांचा सन्मान केला.-----------फोटो - ०२एसीसीएसइस्त्रायलचे भूदलप्रमुख याकोब बराक यांना एसीसी अॅण्ड एसचे कमांडंट मेजर जनरल नीरज कपूर यांनी रणगाड्याची प्रतिकृती भेट दिली.
इस्त्रायल भूदलप्रमुखांची नगर येथील आर्मर्ड कोअरला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 8:47 PM