सुधीर लंकेअहमदनगर : वांबोरी पाईप चारीचे पाणी १०२ तलावांसाठी प्रस्तावित असले तरी यातील जास्तीत जास्त पाणी ६० तलावांतच पोहोचते. उर्वरित तलावांत तांत्रिक अडचणींमुळे पुरेसे पाणी पोहोचत नाही, असे प्रशासनाचेही सर्वेक्षण आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारने यावर अद्याप उपाययोजना केलेली नाही.वांबोरी पाईप चारीद्वारे राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी या चार तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र अप्रत्यक्ष ओलिताखाली येईल, असे स्वप्न पाहण्यात आले होते. मात्र, १३६ कोटीपेक्षा अधिक खर्च झालेल्या या योजनेतून हे स्वप्न अद्याप साकारलेले नाही. या चारीद्वारे नगर तालुक्यातील १६, राहुरी ३८, नेवासा १५ व पाथर्डी तालुक्यातील ३३ असे १०२ तलाव भरणे अपेक्षित आहे. मात्र, यातील ६५ तलावांतच पाणी पोहोचते.उर्वरित तलावांत उंचीमुळे पाणी पोहोचत नाही. याचा फटका मढी, तिसगाव या परिसराला बसतो. हा परिसर चढावर असल्याने या भागात पाणी सोडताच मागील पाईपलाईनला गळती लागते.एकाच वेळी १०२ तलावांत पाणी पोहोचायला हवे, अशा पद्धतीचा हा प्रकल्प आहे. मात्र, सर्व तलावांत पाणीच पोहोचत नाही. मध्यम प्रकल्प विभागामार्फत या योजनेचे काम करण्यात आले आहे. जो भाग उंचावर असेल तेथील चढ काढूनच चारी टाकणे आवश्यक होते. मात्र त्या बाबीची पूर्तता झालेली दिसत नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराचे बिलही थांबविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.च्या चारीच्या लाभक्षेत्रातील चारही तालुक्यांत शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे व बाळासाहेब मुरकुटे हे भाजपचे आमदार आहेत. खासदार दिलीप गांधी हेही भाजपचे आहेत. राज्यात व केंद्रात भाजपचीच सत्ता असल्याने या योजनेतील त्रुटी दूर करुन सरकार तोडगा काढू शकते. मात्र, आमदार-खासदार काय भूमिका घेतात याकडे शेतकºयांचे लक्ष आहे. ब-याचदा केवळ निवडणुकांच्या काळात या चारीचा प्रश्न काढला जातो व नंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असाही शेतक-यांचा अनुभव आहे. या चारीवर अवलंबून असणारे शेतकरी निवडणुकांत याबाबत जाब विचारण्याची शक्यता आहे.चारीत ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्याबाबत या योजनेचे काम करणाºया संबंधित विभागाला कळविण्यात आले आहे. सर्व तलावांत पाणी पोहोचत नाही हे वास्तव आहे. - आर.पी. मोरे, कार्यकारी अभियंता.
(क्रमश:)