कोपरगाव तालुक्यातील २९पैकी २० ग्रामपंचायतींवर तसेच राहाता तालुक्यातील २ अशा २२ ग्रामपंचायतींवर कोल्हे गटाने आपला झेंडा फडकविला आहे. त्यानिमिताने सोमवारी (दि. १८) ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर युवानेते विवेक कोल्हे यांनी भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्याप्रसंगी कोल्हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुधाकर रोहम, केशव भवर, विजय आढाव, विश्वास महाले, ज्ञानेश्वर परजणे, विक्रम पाचोरे, बाळासाहेब पानगव्हाणे, किरण खर्डे यांच्यासह ग्रामीण भागातील नवनिर्वाचित सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले, सर्वात प्रथम ज्या-त्या गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग तसेच पार्लमेंटरी बोर्ड यांच्या प्रयत्नांमुळेच हा विजय मिळाला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या गावच्या कुस्त्या असतात. वरचे पहिलवान यात कधीच उतरत नसतात. त्या गावातल्याच पहिलवानांना खेळून द्यायच्या असतात. परंतु, विद्यमान आमदारांनी या निवडणुकीत गावोगाव, वाड्या, वस्त्या पिंजून काढल्या. विशेष बाब म्हणजे ज्या-ज्या ठिकाणी आमदारांनी प्रचार केला. त्या बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये त्यांच्या पॅनलचा पराभव झाला. त्यामुळे हा त्यांचाच पराभव आहे, असे आम्ही समजतो. तसेच येथून पुढे आमची अशीच विजयाची घोडदौड सुरूच राहणार आहे. मात्र, झालेल्या परावभावातून आमदारांनी बोध घेऊन त्यांच्या कार्यपद्धतीचे आत्मचिंतन करून त्यांनी बदलावे. अशीच एक विरोधक म्हणून आमची मागणी राहील, असा टोलाही कोल्हे यांनी लगावला. तसेच आमच्या ताब्यातील कोकमठाण ग्रामपंचायत ही विरोधकांकडे गेली, याचेही आम्ही आत्मचिंतन करू तसेच संवत्सर ग्रामपंचायतीमध्ये आमचे दोन सदस्य निवडून आले आहेत. येत्या काही कालखंडात ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेऊ.
........
फोटो१९- विवेक कोल्हे
190121\img_20210119_142801.jpg
कोपरगाव येथील पत्रकार परिषदेत बोलताना युवा नेते विवेक कोल्हे, समवेत भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर रोहम, केशव भवर, विजय आढाव, ज्ञानेश्वर परजणे आदी.