अहमदनगर : जिल्ह्यातील के.के. रेंज प्रश्नात राजकारण आल्याने हा प्रश्न सुटू शकला नाही, असे सांगून व्हीआरडीईचे के.के. रेेंज करू नका, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे यांनी येथे केले. तसेच राष्ट्रीय स्तरावरील केंद्र नगरमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
संरक्षण विभागाच्या व्हीआरडीईचे केंद्र स्थलांतरित होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुजय विखे यांनी डीआरडीओच्या अध्यक्षांचे तांत्रिक सल्लागार संजीव जोशी यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. याबाबत येथील कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी खासदार विखे यांनी नुकतीच व्हीआरडीईला भेट दिली. यावेळी व्हीआरडीईमध्ये काही बदल होणार आहेत. हे बदल सर्व कर्मचाऱ्यांनी स्वीकारणे आवश्यक आहे. व्हीआरडीईमध्ये बदल करताना नगरला अनुकूल परिस्थिती कशी निर्माण करता येईल. येथील संस्थेचे मजबुतीकरण करण्यासाठी कुठल्या बाबींचा समावेश असावा, नवीन काय करता येईल, यासाठी आपला प्रयत्न आहे.
संसदेचे अंदाजपत्रकीय अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन संपल्यानंतर साधारण ५ ते १० फेब्रुवारी यादरम्यान संरक्षण मंत्री व डीआरडीओच्या अध्यक्षांकडे हा प्रश्न मांडणार असल्याचे विखे म्हणाले.
....
के.के. रेंजबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल
कें.के. रेंजच्या प्रश्नात राजकारण आले. त्यामुळे हा प्रश्न श्रेयवादाचा झाला. शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली. हा प्रश्न पूर्णपणे केंद्र सरकारशी संबंधित असल्याने आपणच तो सोडवू शकतो, असा दावा विखे यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांनी एकाच देवावर विश्वास ठेवावा. सर्व मंदिरात जाऊ नका. एकाचवेळी सर्व मंदिरात जाऊन प्रसाद घेतल्यास कोणता देव प्रसन्न झाला, हे समजत नाही. अशी टिप्पणी त्यांनी केली.
...
सूचना फोटो व्हीआरडी नावाने आहे.