शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

अन्याय विरुद्ध न्यायाची लढाई

By admin | Published: October 03, 2014 11:58 PM

पाथर्डी : पंकजा मुंडेच्या मागे सर्वांनी शक्ती उभी करा़ , असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भगवानगडावर जमलेल्या मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना दिले़

पाथर्डी : दुर्बल घटकांसाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्य झिजविले़ तोच वारसा आता पंकजा मुंडे चालवित आहे़ त्यांच्या मागे सर्वांनी शक्ती उभी करा़ त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भगवानगडावर जमलेल्या मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना दिले़ महाराष्ट्रात अन्याय विरुद्ध न्यायाची लढाई असून यामध्ये न्यायाचा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़भगवानगडावर गेल्या ३५ वर्षापासून स्व. मुंडे दसरा मेळाव्याला आवर्जून हजेरी लावत आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत़ मात्र, त्यांच्या निधनानंतर भगवानगडावर होणारा हा पहिलाच दसरा मेळावा शुक्रवारी झाला़शहा भाषणाला उठल्यानंतर गर्दीमधून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करा अशा घोषणा होऊ लागल्या़ ते पाहून मी या ठिकाणी राजकीय वक्तव्य करण्यासाठी नाही तर भगवानबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असे सांगत शहा यांनी वेळ मारुन नेली़ पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही माझ्यासोबत आहात, हीच माझी खरी ताकद आहे. आज या ठिकाणी गर्दी व उत्साह असला तरी वातावरण उदास आहे़ कारण माझे बाबा या ठिकाणी नाहीत. त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला़ तोच वारसा मी चालवित आहे. माझी लढाई कोणत्या पक्षाशी तसेच थातूर-मातूर नेत्यांशी नाही़ माझी लढाई नियतीशी आहे. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणायची हे मुंडे यांचे स्वप्न होते़ ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे़ महाराष्ट्रात बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी गर्जना मुंडे यांनी केली़ यावेळी गडाचे महंत नामदेव शास्त्री, एकनाथराव खडसे, गुजरातचे मंत्री शंकरभाई चौधरी, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे, प्रीतम मुंडे-खाडे, खा. दिलीप गांधी, आ. शिवाजी कर्डिले, आ.राम शिंदे,मोनिका राजळे,अमित पालवे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी) पंकजा यांना अश्रू अनावरस्व. गोपीनाथ मुंडे यांच्या अनुपस्थितीत शुक्रवारी भगवानगडावर पहिलाच दसरा मेळावा झाला़ या मेळाव्यास अभूतपूर्व गर्दी जमली होती. मागच्या दसरा मेळाव्यात स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या भाषणाची फित या मेळाव्यात ऐकविण्यात आली़ ते ऐकताना आ. पंकजा मुंडे यांना गहिवरुन आले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनाही अश्रू आवरणे कठिण झाले़