शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
5
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
7
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
8
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
9
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
10
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
11
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
12
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
14
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
15
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
16
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
17
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
18
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
19
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
20
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

जिल्हा परिषदेत असा झाला महाआघाडीचा पॅटर्न यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 5:14 PM

साहेबराव नरसाळे । लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न नगर जिल्हा परिषदेतही यशस्वी झाला़ जिल्ह्याच्या राजकारणातील दिग्गज नेते आमदार राधाकृष्ण विखे, राम शिंदे, शिवाजी कर्डिले यांना जोरदार झटका देत राष्ट्रवादीच्या राजश्री घुले अध्यक्षपदी तरी काँगे्रसचे प्रताप शेळके उपाध्यक्षपदी विराजमान झाले़ निवडणूक लढविण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपने ऐनवेळी निवडणुकीत माघार घेतली़ त्यामुळे घुले, शेळके यांच्या बिनविरोध निवडी झाल्या़

साहेबराव नरसाळे । लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न नगर जिल्हा परिषदेतही यशस्वी झाला़ जिल्ह्याच्या राजकारणातील दिग्गज नेते आमदार राधाकृष्ण विखे, राम शिंदे, शिवाजी कर्डिले यांना जोरदार झटका देत राष्ट्रवादीच्या राजश्री घुले अध्यक्षपदी तरी काँगे्रसचे प्रताप शेळके उपाध्यक्षपदी विराजमान झाले़ निवडणूक लढविण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपने ऐनवेळी निवडणुकीत माघार घेतली़ त्यामुळे घुले, शेळके यांच्या बिनविरोध निवडी झाल्या़ जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांचा वाढीव कार्यकाळ संपल्यामुळे ३१ डिसेंबर रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता़ अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यापासूनच राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी जोरदार तयारी सुरु झाली होती़ दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नगर जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचीच सत्ता स्थापन करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आले होते़ त्यानुसार राष्ट्रवादी, काँगे्रस, शिवसेना, शेतकरी क्रांतीकारी पक्ष यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ जुळविण्याचा चंग बांधला़ महाविकास आघाडीकडे ५० पेक्षा जास्त संख्याबळ झाले़ तसेच काँगे्रसमधील विखे गटही कोंडीत पकडण्यात महाविकास आघाडीला यश आले़ त्यामुळे भाजपकडे फक्त १३ सदस्यच उरले होते़ या १३ सदस्यांच्या जोरावर भाजप निवडणुकीच्या आखाड्यात उतरली़ मंगळवारी (दि़३१) सकाळी राष्ट्रवादीची बैठक होऊन त्यात अध्यक्षपदासाठी घुले व उपाध्यक्ष पदासाठी शेळके यांची उमेदवार जाहीर करण्यात आली़ घुले यांच्या अर्जावर गटनेते कैलास वाकचौरे यांनी सूचक म्हणून सही केली़ तर प्रताप शेळके यांचे सूचक अनिता हराळ या होत्या़ घुले व शेळके यांनी पावणेबारा वाजता उमेदवारी अर्ज दाखल केले़ मात्र, तरीही भाजपचे उमेदवार निश्चित नव्हते़ अर्ज भरण्यासाठी एक वाजेपर्यंत मुदत होती़ १२ वाजून ४५ मिनिटांनी भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांच्यासह अध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता खेडकर व उपाध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या खेडकर यांनी अर्ज दाखल केला़ खेडकर यांच्या अर्जावर सुचक म्हणून गटनेते जालिंदर वाकचौरे तर आठरे यांच्या अर्जावर सोमनाथ पाचारणे यांची सही होती़ तीन वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा सुरु करण्यात आली़ या सभेला महाविकास आघाडीच्या सर्व सदस्य उपस्थित राहिले़ मात्र, भाजपचे चार सदस्य गैरहजर होते़ प्रारंभी अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरु झाली़ पीठासन अधिकारी पाटील यांनी अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ दिला़ ३ वाजून २१ मिनिटांनी खेडकर यांनी अर्ज मागे घेतला़ त्यामुळे घुले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली़ त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली़ पीठासन अधिकाºयांनी माघारीसाठी वेळ निश्चित करताच आठरे यांनी माघार घेतली़ त्यामुळे उपाध्यक्षपदाची निवडही बिनविरोध झाली़ पीठासन अधिकारी उर्मिला पाटील यांनी अध्यक्षपदी घुले व उपाध्यक्षपदी शेळके यांच्या बिनविरोध निवडी घोषित केल्या़ माजी अध्यक्षा शालिनी विखे यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार केला़