शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

‘मुळा’च्या कालव्यांना आजपासून पाण्याचे आवर्तन

By admin | Published: July 26, 2016 11:52 PM

राहुरी : मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यांतून बुधवारी पिण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला़ पाण्याचा गैरवापर होऊ

राहुरी : मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यांतून बुधवारी पिण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला़ पाण्याचा गैरवापर होऊ नये म्हणून कलम १४४ लागू करण्यात आले आहे़ प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली़ मुळा धरणाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, शेवगावचे तहसीलदार दादासाहेब गिते, नेवासेचे नामदेव टिळेकर आदी उपस्थित होते़ जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी मुळा धरणातून पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत़ त्यानुसार पालवे यांनी बैठक घेवून पाणी सोडण्याचे निर्देश दिले़ मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव तालुका प्रशासनाने सुचविलेले पिण्याच्या पाण्याचे उद्भव या आवर्तनातून भरले जाणार आहेत़ कालवा फोडून पाणी घेऊ नये किंवा आवर्तनाला अडथळा येऊ नये म्हणून महसूल विभाग व जलसंपदा विभाग संयुक्त कारवाई करणार आहेत़मुळा कालव्यालगत असलेल्या गावांसाठी कलम लागू करण्यात आले आहे़ अनधिकृत तलावात पाणी सोडले जाऊ नये, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे जलसंपदा सूत्रांनी सांगितले़ मुळा धरणात सायंकाळी १४ हजार ७०० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली़ आवक १ हजार १६८ क्युसेकने सुरू आहे़ लाभक्षेत्रावर मंगळवारी पावसाने हजेरी लावली़ (तालुका प्रतिनिधी)