शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
3
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
4
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट
5
Rashmi Shukla IPS: 22 व्या वर्षी बनल्या IPS, रश्मी शुक्लांचं किती झालंय शिक्षण?
6
IND vs NZ : वानखेडेवर मुंबईकरांची दिवाळी! चाहत्यांसाठी विराट कोहली थिरकला, VIDEO
7
फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान
8
काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट
9
हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा
10
IND vs NZ, 3rd Test : जड्डूचा 'पंजा' अन् वॉशिंग्टनचा 'चौका'; न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला
11
शिवाजी महाराजांची मूर्ती पाहताच चिमुकली नतमस्तक, मराठी अभिनेत्रीच्या लेकीचं होतंय कौतुक; पाहा व्हिडिओ
12
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
13
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
14
एकावर ३ फ्री शेअर देणार 'ही' कंपनी, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; २७००% वाढलाय भाव
15
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
16
Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा?
17
WhatsApp ने आणलं कस्टम चॅट लिस्ट फीचर; युजर्सचा होणार मोठा फायदा, कसा करायचा वापर?
18
Gold Silver Price Review: सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी...
19
"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला
20
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 शेअर्स...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा

मांडवगणमधील पाणीपातळी ३०० वरून ३० फुटावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:21 AM

मांडवगण. श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे १० हजार लोकवस्तीचं गाव. येथील वैशिष्ट्य म्हणजे जवळपास प्रत्येकाच्या दारात स्वत:चा आड. गेल्या दोन-तीन वर्षांपर्यंत या आडातून मोठ्या मुश्किलीने घरगुती वापरासाठी दहा-बारा हंडे पाणी निघायचे. परंतु अलिकडेच गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे हे आड पूर्ण क्षमेतेने भरले आहेत.

ठळक मुद्दे जलयुक्तची यशोगाथा जनकल्याण, लोकसहभागातून पाण्याची मिळकत

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : मांडवगण. श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे १० हजार लोकवस्तीचं गाव. येथील वैशिष्ट्य म्हणजे जवळपास प्रत्येकाच्या दारात स्वत:चा आड. गेल्या दोन-तीन वर्षांपर्यंत या आडातून मोठ्या मुश्किलीने घरगुती वापरासाठी दहा-बारा हंडे पाणी निघायचे. परंतु अलिकडेच गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे हे आड पूर्ण क्षमेतेने भरले आहेत. शेतातही ३०० फुटांवरील पाणीपातळी चक्क ३०-४० फुटांवर आली आहे. विहिरी, कुपनलिका आजही भरलेल्या आहेत. शासनाचे जलयुक्त शिवार, जनकल्याण संस्था व लोकसहभाग या त्रिसूत्रीच्या मेहनतीने आज गाव पाणीदार झाले आहे.श्रीगोंद्यापासून उत्तरेला सुमारे ३० किलोमीटरवर मांडवगणचा सहा ते सात हजार हेक्टरचा भौगोलिक पसारा आहे. त्यात चार हजार हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्र आहे. श्रीगोंदा तालुका सधन मानला जात असला तरी मांडवगणला कोणत्याही जलसिंचनाची सोय नाही. गाव केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पावसाळी पिके केवळ हाती लागायची. उन्हाळ्यात नेहमीप्रमाणेच टँकर ठरलेला. गाव टंचाईग्रस्त असल्याने शासनाने २०१४-१५मध्ये जलयुक्त शिवारमध्ये गावचा समावेश केला. लोकांनाही पाण्याचे महत्व समजल्याने जलसंधारणाच्या कामात श्रमदान वाढले. जनकल्याण खासगी संस्थेने गावाला मदत केली. या सर्वांनी मिळून गावचे दुष्काळी चित्र केवळ बदललेच नाही, तर गावाला पुन्हा दुष्काळ शिवणार नाही, याची तजवीज केली. गावातून जाणाऱ्या नदीवर सुमारे २२ फूट खोलवर बंधारे गावकºयांनी उकरले. जि. प. लघूसिंचनाद्वारे सिमेंट नालाबांधमधील गाळ गाढल्याने पाणीसाठवण क्षमता वाढली. या सर्व कामांमुळे सुमारे ८०० टीसीएम नवीन पाणी उपलब्ध झाले. सध्या गावात लिंबू, डाळिंबाच्या बागा, ऊस, तसेच इतर नगदी पिकांसाठी पाणी उपलब्ध आहे.‘‘जलसंधारणाच्या कामांमुळे गावाला नवीन दिशा मिळाली. गेल्या अनेक वर्षांपासूनची पाण्याची समस्या चुटकीसरशी सुटली. केवळ पावसावर अवलंबून असणारी बाजरी, मूग, हुलगा, मटकी ही पिके जाऊन आता रब्बीतील ज्वारी, मका, कांदा, ऊस ही पिके, तसेच फळबागा लोकांना पहायला मिळत आहेत.’’- प्रताप चव्हाण, ग्रामस्थ, मांडवगण‘‘जलयुक्त शिवार, जनकल्याण व लोकसहभागातून एकेकाळी असणारा दुष्काळी गाव हा शिक्का गावाने पुसला आहे. गावात पूर्वी ३०० फूट कुलनलिका घेतली तरी कोरडी जायची, आज तिथेच केवळ ३०-४० फुटांपर्यंत पाणी आहे. एकूणच सिंचन क्षेत्र वाढले आहे. अजूनही गावातील दोन नद्यांवर बंधाºयांची संख्या वाढवता येऊ शकते. ’’- सुरेश लांडगे, उपसरपंच, मांडवगण‘‘गावात १२ वाड्यांचा समावेश असून काही बाजूंनी डोंगर आहे. आतापर्यंत पावसाचे पाणी वाहून जायचे. फेब्रुवारी, मार्चमध्ये टँकरने पाणीपुरवठा ठरलेला होता. मात्र यंदा टँकरची गरजच लागणार नाही. सर्वांचे आड, विहिरी, कुपनलिका, बंधाºयांत समाधानकारक पाणीसाठा आहे.’’- विनोद देशमुख, ग्रामस्थ, मांडवगणजलयुक्तमधून झालेली कामेकंपार्टमेंट बंडिंग (बांधबंदिस्ती) १६६० हेक्टरवर.सिमेंट नालाबांध - १०शेततळे - २गॅबीयन बंधारे - ५वनराई बंधारे -६खोल सलग समतल चर - ८०लोकसहभाग गाळ काढणे -२पाझर तलाव दुरूस्ती - १विहीर पुनर्भरण - ३

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणी