वृंदावन, मातोश्रीनगर येथे नवीन वसाहत वाढल्यामुळे जुन्या पाईपलाईनमधून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे या भागाला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ सप्रे यांच्या हस्ते नारळ वाढवून गुरुवारी नवीन पाईपलाईनच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच डोंगरे, माजी सरपंच दत्तापाटील सप्रे, सदस्य सागर सप्रे, कल्पना गीते, रंजना दांगट, दीपक गीते, ग्रामसेवक संजय मिसाळ, नागरिक गजानन भांड, बाबासाहेब दांगट, सीताराम कराळे, किरण नेवसे, अक्षय पिसे, रमेश काळणगे, सोनू नाईकवाडे, अक्षय साळवे आदी उपस्थित होते. तसेच गणेशनगर येथे अंतर्गत गटार कामास गुरुवारी प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे येथील पाणी निचऱ्याचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.
................
१० नवनागापूर
वृंदावन, मातोश्रीनगर येथे नवीन पाईपलाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. याप्रसंगी सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, माजी सरपंच दत्तापाटील सप्रे, सदस्य सागर सप्रे, दीपक गीते आदी.