निघोज : पारनेर तालुक्यातील निघोजसह परिसरात पाणी प्रश्न गंभीर बनू लागला आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांना वणवण करावी लागत आहे. कुकडीचे पाणी न मिळाल्यास आगामी काळात पाणी प्रश्न आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
निघोज येथील प्रभाग क्र.४ व प्रभाग ६ मध्ये पाणीटंचाई जाणवू लागल्याने माजी सरपंच ठकाराम लंके, ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद, सदस्य गणेश कवाद, दिगंबर लाळगे यांनी एकत्र येऊन खासगी विहिरीचे मालक बाळासाहेब लाळगे व लंके भावकीची विहिरीतून स्वखर्चाने टँकरच्या साहाय्याने पाणी वाटप सुरू केले आहे.
कोरोनाच्या काळात पाण्यासाठी भटकंतीची वेळ येऊ नये, यासाठी राबविलेला हा उपक्रम समाधानकारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यासाठी उपक्रमासाठी निघोज संस्था परिवाराचे अध्यक्ष वसंतराव कवाद, मळगंगा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विठ्ठलराव कवाद, संदीप लाळगे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कवाद, मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त विश्वासराव शेटे, नवनाथ लाळगे, राजू ढवळे, गुरुदत्त ॲग्रोचे संचालक संदीप लंके, दत्ताजी लंके, सीताराम लंके, रूपेश लंके, सचिन लंके, ऋषिकेश लंके, ज्ञानेश्वर लंके, गणेश लंके, सतीश राऊत, नवनाथ लाळगे, विठ्ठल शेटे, दीपक लाळगे, सार्थक लाळगे, स्वराज कवाद यांचे सहकार्य लाभत आहे.
---
१५ निघोज पाणी
निघोजमध्ये टँकरद्वारे पाणी वाटप करण्यात येत आहे. यावेळी माजी सरपंच ठकाराम लंके, ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद, सदस्य गणेश कवाद, दिगंबर लाळगे व इतर.