कोंभळी : कर्जतचे कुकडी आवर्तन शुक्रवारी (दि. १९ जून) सकाळी बंद करण्यात आले आहे. श्रीगोंदा भागात या आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले. यातूनच सीना लघु मध्यम प्रकल्पात काही प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसिंचन विभागाने दिली आहे.
कुकडीच्या चालू आवर्तनातून सीना धरणात ५० दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार आहे. त्यात संभाव्य गरज पाहून हे पाणी वाढविण्यात येईल, असे कर्जत येथील कुकडी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी बाजीराव थोरात यांनी सांगितले.
श्रीगोंदा, कर्जत तालुक्यात अजून मोठा पाऊस झाला नसल्याने खरिपातील पेरणी झालेल्या पिकांना कुकडीच्या पाण्याने मोठा दिलासा मिळणार आहे.