शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

जिल्ह्यात ४११ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 11:23 AM

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून गेल्या चार महिन्यांतच टँकरची संख्या चारशेच्या पुढे गेली आहे. हिवाळ्यातच सुमारे सव्वासात लाख लोकांना टँकरने पाणी द्यावे लागत असून अजून उन्हाळ्याचे चार महिने बाकी आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून गेल्या चार महिन्यांतच टँकरची संख्या चारशेच्या पुढे गेली आहे. हिवाळ्यातच सुमारे सव्वासात लाख लोकांना टँकरने पाणी द्यावे लागत असून अजून उन्हाळ्याचे चार महिने बाकी आहेत. त्यामुळे यंदा टँकरची संख्या हजारी पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.यंदाचा पावसाळा संपूर्ण कोरडा गेला. पावसाने सरासरीही गाठली नाही. त्यामुळे खरिपासह रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून निसटला. सुदैवाने धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांचे साठे बºयापैकी आहेत. आॅक्टोबरपासूनच जिल्ह्यात टंचाईने डोके वर काढल्याने टँकर सुरू करण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी धरणांतील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवत जुलैपर्यंत पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन केले. अद्याप हिवाळाच सुरू आहे. एकीकडे आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या चार महिन्यांत जिल्ह्यात पारा निच्चांकी घसरला असला तरी दुसरीकडे टँकरची संख्या भर हिवाळ्यातही वाढतच गेली. आजअखेर जिल्ह्यात ४११ टँकरने ७ लाख १९ हजार ८२२ लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.अजून फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे असे उन्ह्याळ्याचे चार महिने जायचे आहेत. या काळात तीव्र पाणी व चाराटंचाई भेडसावणार असल्याने टँकरची संख्या एक हजारच्या वर जाण्याची दाट शक्यता आहे. गेल्या १७ वर्षांच्या इतिहासात टँकरची संख्या साडेआठशेच्या वर गेलेली नाही. २००३मध्ये ६९९, सन २०१२मध्ये ७०७ व २०१५मध्ये ८२६ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता.यंदा मात्र उन्हाळा सुरू होण्याआधीच टँकर चारशेच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे हा आकडा तिप्पट होण्याची दाट आहे.टँकरच्या आवाजाकडेच डोळेग्रामीण भागात टँकर आल्यानंतर लगबगीने पाणी भरणे हेच लोकांचे मुख्य काम सध्या झालेले आहे. शेतात काडीचेही काम नाही अन् गावातील विहिरी, बारवात पाण्याचा टिपका नसल्याने सकाळपासून टँकरची वाट पाहणे हीच महिला वर्गाची ड्युटी बनली आहे. सार्वजनिक विहिरीत टँकरचे पाणी सोडले की एकच झुंबड उडते अन् अर्ध्या तासात विहीर पुन्हा रिकामी केली जाते. काही ठिकाणी गल्लोगल्ली जाऊन प्रतिमाणसी मोजून पाणी दिले जाते.जनावरांच्या पाण्याचा हिशोब नाहीदररोज प्रतिव्यक्ती २० लिटर याप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा केला जातो. या हिशोबाने लोकसंख्येच्या प्रमाणात तीन ते चार खेपा केल्या जातात. परंतु यामध्ये जनावरांसाठी पाण्याची तरतूद नसल्याने शेतकºयांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. छावण्या सुरू करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असली तरी अद्याप जिल्ह्यात कोठेही छावणी सुरू झालेली नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय