अहमदनगर : पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने जिल्हाधिका-यांनी नगर तालुक्यातील पाच गावात टँकर मंजूर केले आहेत.मागील वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यात पाण्याची समस्या या उन्हाळ्यात जाणवली नाही. त्यातच तालुक्यातील बहुंताशी गावात जलयुक्तच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झाली . यामुळे दुष्काळाची दाहकता कमी झाली. मात्र आता उन्हाळा संपत आल्याने पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या वाढू लागल्याने नगर तालुक्यातील पाच गावानी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा प्रस्ताव प्रशासनाला सादर केला होता. त्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. ससेवाडी , इमामपूर, दश्मी गव्हाण, मदडगाव, सांडवे या पाच गावांना सध्या टँकर मंजूर करण्यात आला आहे .
नगर तालुक्यात ५ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 5:28 PM