शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

पाऊस जिरवला तरच मिळणार पाणी; महाराष्ट्राच्या पोटात १४ अब्ज क्युबिक मीटर पाणी

By अविनाश साबापुरे | Published: April 07, 2024 5:51 AM

महाराष्ट्राच्या पोटात १४ अब्ज क्युबिक मीटर पाणी

अविनाश साबापुरे

यवतमाळ : उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असतानाच राज्याच्या भूगर्भात अजूनही १४ अब्ज क्युबिक मीटर जलसाठा उपलब्ध असल्याचा अहवाल केंद्रीय भूजल मंडळाने दिला आहे. मात्र, गेल्या वर्षी ज्यांनी पाऊस साठविला, त्याच प्रदेशांना या पाण्याचा लाभ होऊ शकणार आहे. इतरांची टँकरवारी यंदाही कायम राहणार आहे. 

केंद्रीय भूजल मंडळाने महाराष्ट्रातील भूजलसाठ्याची आकडेवारी वार्षिक अहवालात जाहीर केली आहे. २०२३ मध्ये महाराष्ट्रात पडलेला पाऊस, त्यातून जमिनीत जिरलेला पाऊस, त्यातून वर्षभरात झालेला पाण्याचा उपसा आणि आता भविष्यकाळासाठी वापरण्यायोग्य उरलेला जलसाठा अहवालात नमूद केला आहे.

गेल्या वर्षीचा पाऊस अन् भूजल साठ्याची सद्य:स्थिती

जल पुनर्भरण झाले : ३२ अब्ज क्युबिक मीटरपाण्याचा उपसा : १६ अब्ज क्युबिक मीटरजमिनीत शिल्लक पाणी :१४ अब्ज क्युबिक मीटरपाण्याची वाफ झाली : ०२ अब्ज क्युबिक मीटर

या जिल्ह्यांना भासणार टँकरची गरज७० टक्क्यांपेक्षा अधिक भूजलाचा उपसा करणाऱ्या जिल्ह्यांना केंद्रीय भूजल मंडळाने ‘ओव्हर एक्स्प्लाॅइटेड’च्या वर्गवारीत नमूद केले आहे. येथे अत्यल्प भूजल शिल्लक असल्याने या जिल्ह्यांना उन्हाळ्यात टँकरद्वारेच नागरिकांची तहान भागवावी लागणार आहे. यात अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती टक्के साठा?जिल्हा    उपसा झाला    शिल्लक साठाअमरावती    ९१.८३    ८.१७अहमदनगर    ७९.२०    २०.८०जळगाव    ७८.७६    २१.२४सोलापूर    ७७.५४    २२.४६बुलढाणा    ७६.९५    २३.०५छ.संभाजीनगर    ७१.६४    २८.३६पुणे    ६९.६५    ३०.३५अकोला    ६५.५९    ३४.४१सातारा    ६२.११    ३७.८९धाराशिव    ६२.०१    ३७.९९वाशिम    ६०.२०    ३९.८०.बिड    ५९.२२    ४०.७८नाशिक    ५८.४१    ४१.५९लातूर    ५४.८८    ४५.१२जालना    ५४.८५    ४५.१५सांगली    ५४.१९    ४५.८१वर्धा    ५३.५५    ४६.४५धुळे    ५१.७७    ४८.२३नागपूर    ४८.९४    ५१.०६परभणी    ४६.५०    ५३.५०सिंधुदुर्ग    ४३.३३    ५६.६७कोल्हापूर    ४२.४५    ५७.५५नंदुरबार    ३८.०८    ६१.९२हिंगोली    ३६.४१    ६३.५९यवतमाळ    ३३.७५    ६६.२५नांदेड    ३२.३७    ६७.६३भंडारा    ३०.२२    ६९.७८चंद्रपूर    २९.३२    ७०.६८गोंदिया    २६.३१    ७३.६९गडचिरोली    २४.३७    ७५.६३पालघर    २३.८५    ७६.१५ठाणे    १९.०७    ८०.९३रायगड    १७.९४    ८२.०६रत्नागिरी    १७.३०    ८२.७०एकूण    ५३.८३    ४६.१७ 

टॅग्स :MumbaiमुंबईWaterपाणीFarmerशेतकरी