शेती, सहकार, सिंचन, राजकारण आणि मानवी जीवन मूल्यावर प्रकाशन टाकणारा हा ग्रंथ असून तो प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. आपल्या गरिबीचा विसर कधी पडू दिला नाही. कोणामधेही भेदभावरहित राजकारण करण्याचे स्व. बाळासाहेब यांच्या वडिलांनी त्यांना सल्ला दिला. दुष्काळमुक्तीचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. दुष्काळी प्रदेश काय आहे, असे एकदा लोकसभेत अटलबिहारी वाजपेयी यांनी विचारले.
यावेळी स्व. विखे पाटील यांचे भाषण ऐकून वाजपेयी यांनी प्रभावी झाले. संपूर्ण भारतातील दुष्काळमुक्तीचा मार्ग वाजपेयी यांना स्व. विखे पाटील यांच्याच भाषणातून सापडला, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्रातील दुष्काळमुक्तीचे कामही विखे पाटील यांच्या प्रेरणेमुळेच सुरू झाले. उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्हा, मराठवाडा ज्या दिवशी दुष्काळमुक्त होईल,तीच स्व. विखे यांची स्वप्नपूर्ती होईल.
प्रवरानगर येथील स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन सोहळ््यात ते बोलत होते. प्रत्येकाने स्व. विखे पाटील यांचे आत्मचरित्र वाचल्यास प्रत्येकाला आपला जीवनाच्या यशाचा मार्ग सापडेल.