श्रीगोंदा : आम्ही विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला आहे. आम्ही भाजपातच राहणार राहणार आहेत. आम्ही काँग्रेसमध्ये स्वगृही परतणार ही खोडसाळपणाची चर्चा आहे, अशी माहिती नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. राजेंद्र नागवडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची नुकतीच भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर नागवडे हे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार अशा चर्चेचे गुºहाळ सुरू होते. या चर्चेबद्दल राजेंद्र नागवडे यांनी सांगितले की, विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही भाजपात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपाचे काम केले. काँग्रेसमध्ये असताना बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर निष्ठेने काम केले. त्यांच्याशी आमचे कोणतेही मतभेद नव्हते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपात गेले. त्यानंतर खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी भाजपात येण्याची आॅफर दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. श्रीगोंदा तालुक्यातील विकासाचे प्रश्न प्राधान्याने सोडविलेले जातील, असे आश्वासन दिल. यामुळे आम्ही भाजपात प्रवेश केल्याचेही नागवडे यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. चर्चा करण्याचे कोणतेही कारण नाही.पण उलटसुलट अफवा उठविल्या जातात. आपण भाजपातच आहोत. कोणी खोडसाळपणाची चर्चा करू नये, असेही नागवडे म्हणाले.
आम्ही भाजपातच; कोणी खोडसाळपणाची चर्चा करू नये-राजेंद्र नागवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 1:51 PM