यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, मंगेश त्रिभुवन, शिर्डी शहराध्यक्ष सचिन शिंदे, उपाध्यक्ष रवींद्र गोंदकर, दीपक वारुळे, पोपट शिंदे, मनोज लोढा, सुधीर शिंदे, संघटक राजेंद्र गोंदकर, भाजयुमोचे किरण बोराडे, योगेश गोंदकर, राम आहेर, पंडित गुडे उपस्थित होते.
विखे म्हणाले, शिर्डीच्या विकासात वडिलांचे मोठे योगदान आहे. निधीचा वापर केल्याने शहराचा सर्वांगीण विकास झाला आहे. पक्ष व सत्ता बदलामुळे वडिलांचे मंत्रिपद, आईचे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद गेले. सर्वाधिक नुकसान आमचे झाले असले तरी मी आजही हसत आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून नव्हे तर समाजकारणाच्या माध्यमातून आम्ही काम करत आलो आहोत. विकासाच्या मुद्यावर मतदान होत असते. सूत्रसंचालन रवींद्र गोंदकर यांनी केले, तर आभार शहराध्यक्ष सचिन शिंदे यांनी मानले.