शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

वेळ आलीच तर.. नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईवर धडक मारू -विवेक कोल्हे

By सचिन धर्मापुरीकर | Updated: November 3, 2023 18:31 IST

जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध : कोपरगावात लाक्षणिक उपोषण

कोपरगाव (जि. अहमदनगर) : सरकारमध्ये असतानाच आमचे बहुतांश आंदोलन झाली आहे. हक्काच्या व्यक्तीकडेच हट्ट धरला जातो. सरकार जरी आमच्या विचाराचे असले तरी या ठिकाणी आम्ही सत्ताधारी नाही. त्यामुळे राजकिय, प्रशासकिय यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधींनी दाखवलेले नैराश्य चिंताजनक आहे. त्यामुळे 'ज्याचे शेतकऱ्यांवर लक्ष तोच आपला पक्ष, हेच आपले धोरण'. सणासूदीच्या दिवसांत आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन तिव्र करावे लागेल. नगर, नाशिक येथील शेतकऱ्यांना संघटीत करून वेळ पडल्यास मुंबईवर धडक मारण्याची आमची तयारी असल्याचा इशारा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिला.

जायकवाडी धरणात उर्ध्व गोदावरी खोऱ्यातुन पाणी सोडण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून शुक्रवारी कोपरगाव येथील तहसिल कार्यालयासमोर विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी निवेदन स्विकारले.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यावेळी म्हणाल्या, 'कसे लढायचे, आणि कसे भिडायचे' हे आम्हाला स्व. शंकरराव कोल्हे यांनी शिकवले आहे. पाणी हा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे राजकिय पक्ष, संघटनांनी एकत्र येवून लढा उभारण्याची गरज आहे. गोदावरी खोरे तुटीचे असतानाही येथून पाणी सोडणे म्हणजे, 'एकाला तारण्यासाठी, दुसऱ्याला मारण्या सारखे आहे'. आमचे हक्काचे पाणी घेण्याऐवजी जायकवाडीच्या २६ टीएमसी मृतसाठ्यातील ५ टीएमसी पाणी वापरण्याची परवाणगी दिली, तर नगर, नाशिकचे पाणी सोडण्याची गरज पडणार नाही.

यावेळी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, बाळासाहेब वक्ते, दिलीप बनकर, दत्ता काले, दिपक चौधरी, संजय सातभाई, शरदराव थोरात, साहेबराव रोहोम, केशवराव भवर, राजेंद्र सोनवणे, दिलीप दारुणकर, प्रदिप नवले, विजय रोहोम, शिवाजीराव वक्ते, रविंद्र पाठक, सुनील देवकर, श्री आढाव, संदीप देवकर, अनिल गायकवाड, विनय भगत, विवेक सोनवणे, विनोद चोपडा, कैलास जाधव, बबलू वाणी, वैशाली साळूंके, वैशाला आढाव यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागण्यामेंढेगिरी समिती कालबाह्य झालेली आहे, त्यासाठी जो अभ्यासगट नेमण्यात आलेला आहे, त्याचा अहवाल आल्याशिवाय उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समुहातुन जायकवाडीसाठी पाणी सोडण्यांत येवु नये. गोदावरी कालवे लाभक्षेत्रात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शेती, पिण्याचे पाणी, पशुधन यासाठी जी आर्वतने द्यावी लागणार आहे, त्यात पाण्यांचे प्रचंड लॉसेस होणार असल्याने पाण्याची तुट निर्माण होणार आहे. त्यामुळे मुळातच तुट असलेल्या क्षेत्रातुन जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येवु नये.

नगर नाशिक, विरुध्द मराठवाडा असा प्रादेशिक पाण्यांचा वाद कायमस्वरूपी मिटविण्यांसाठी अप्पर वैतरणातुन समुद्रास वाहुन जाणारे अतिरिक्त पाणी सेंडल गेट द्वारे त्वरीत मुकणे धरणांत वळवून अप्पर वैतरणा धरणाची पाणीसाठवण क्षमता वाढवावी. सहयाद्री पर्वत माथ्यावरील पश्चिमेचे अतिरिक्त समुद्राला वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे ३० वळण बंधाऱ्याद्वारे तातडीने गोदावरी खोऱ्ंयात वळविण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. पश्चिम वाहिन्या, नार पार, दमणगंगा, पिंजाळ, वैतरणा, उल्हास खोऱ्यातील समुद्राला वाहुन जाणारे अतिरिक्त पाणी पुर्वेकडे गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी युध्द पातळीवर नियोजन करावे.

गोदावरी खोरे पाणी कृती समितीची स्थापनालाक्षणिक उपोषणात हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी गोदावरी खोरे पाणी कृती समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या ध्वजाचे अनावरण माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी 'मराठवाडा तुपाशी, नगर-नाशिक उपाशी', ' कोण म्हणतं देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही', मेंढेगिरी समितीचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दाणाणून गेला होता.