अहमदनगर: काँग्रेसने आमदार बाळासाहेब थोरात यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास स्वागतच आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास रंजक स्पर्धा होईल, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर दावा करत माजीमंत्री थोरात यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसमधून पुढे येत आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, की ते एक अभ्यासू नेतृत्व आहे. त्यांच्या कार्याचा विचार करून काँग्रेसने त्यांना दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी. भाजपकडून कोण उमेदवार असेल ते माहित नाही. मात्र काँग्रेसकडून थोरात यांना उमेदवारी मिळाल्यास दक्षिण लोकसभा निवडणूकीत स्पर्धा होईल एवढे निश्चित, असे खासदार विखे पाटील म्हणाले.
नगरच्या जातीय दंगलींबाबत काय म्हणाले, विखे पाटीलअहमदनगर जिल्ह्यात जातीय दंगली घडत असून, याबाबत पोलिसांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. मात्र काही लोक बाहेरून येऊन नगरचे वातावरण खराब करत आहेत, अशी टीका खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केली.
लव्ह जिहाद बाबत विखे म्हणाले..लव्ह जिहाद सारख्या घटना घडत आहेत. या घटना रोखण्याची लोकप्रतिनिधीची जबाबदारी नाही तर, ती सर्वांची जबाबदारी आहे. संबंधित कुटुंबानेही काळजी घेतली पाहिजे, असे खासदार विखे पाटील याबाबत बोलताना म्हणाले. त्या प्रकरणी पोलिसांची चौकशी करण्याचा आदेशशहरातील फकीरवाडा येथील मिरवणुकीत औरंगजेबाचे फलक झळकविण्याची घटना घडली आहे. या मिरवणूकी वेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावयन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत, असे खासदार विखे पाटील यावेळी म्हणाले.