शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

दहा वर्षांनंतर सापडली विहीर

By admin | Published: August 29, 2014 12:59 AM

मिलिंदकुमार साळवे , श्रीरामपूर एका ग्रामस्थाने गावातील पाणीटंचाई दूर करण्यास हातभार लावण्याच्या हेतूने आपल्या सरपंच मित्रास स्वत:ची विहीर गावासाठी दिली खरी,

मिलिंदकुमार साळवे , श्रीरामपूर

एका ग्रामस्थाने गावातील पाणीटंचाई दूर करण्यास हातभार लावण्याच्या हेतूने आपल्या सरपंच मित्रास स्वत:ची विहीर गावासाठी दिली खरी, पण ही विहिरीच नंतरच्या पदाधिकाऱ्यांनी बळकावली. त्यामुळे ग्रामस्थाची विहीर हरवली. ही हरवलेली विहीर तब्बल १० वर्षांच्या लढाईनंतर पुन्हा सापडली. ही विहीर आपल्याच मालकीची असल्याचे भासविणाऱ्या उंबरगाव (ता. श्रीरामपूर) ग्रामपंचायतीचा दावा फेटाळून न्यायालयाने विहीर संबंधित शेतकऱ्याचीच असल्याचा निवाडा नुकताच दिला. तत्कालिन ग्रामसेवक के. बी. कचरे यांनी जवाहर रोजगार योजनेतून सुमारे ५ लाखांचा निधी खर्चून ग्रामपंचायतीनेच ही बांधल्याची कागदपत्रे रंगविली होती. न्यायालयाच्या निकालाने आता हा खर्च कोणत्या विहिरीवर केला व पंचायतीची ‘ती’ विहीर गेली कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गणेश भगिरथ मुंडलिक यांनी त्यांच्या स्वतंत्र मालकीची उंबरगावच्या शेतजमीन गट क्र. १७२ मधील विहीर त्यांच्या तत्कालिन सरपंच मित्र व ग्रामसेवकाच्या विनंतीवरून फुकटात ग्रामपंचायतीस वापरास दिली. ग्रामपंचायतीने त्यांच्या मालकीच्या गट क्रं. १७३ चा उल्लेख करून वीज कनेक्शन घेऊन सायफनद्वारे टाकीत पाणी सोडून गावकऱ्यांची सोय केली. त्यानंतर ग्रामपंचायतीने याच गट क्र. १७३ साठी जवाहर रोजगार योजनेंतर्गत सुमारे ५ लाख रूपये खर्चाची विहीर खोदल्याचे कागदोपत्री दाखविले. प्रत्यक्षात ही विहीर खोदलीच नसल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले. त्यानुसार श्रीरामपूरच्या तहसीलदारांनी गट कं्र. १७३ मधील विहिरीची नोंद रद्द केली. दरम्यान ग्रामपंचायतीने पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केल्याने मुंडलिक यांच्या विहिरीच्या पाण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे तिचे वीज कनेक्शन व सायफन काढून गरजेचे असताना त्यांनी तसे न केल्याने मुंडलिक यांनी पंचायतीस कायदेशीर नोटीस दिली. त्याची दखल न घेतल्याने या ग्रामस्थाने आपली विहीर मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. पंचायतीने न्यायालयात तसेच पंचायत समिती, तहसील व जिल्हा परिषदेकडे ही विहीर आपल्याच मालकीचा दावा केला. खरेखोटेपणा सिद्ध करण्यासाठी श्रीरामपूरच्या दिवाणी न्यायालयात अ‍ॅड. बी. एफ. चुडीवाल यांच्यामार्फत ग्रामपंचायतीविरूद्ध २००३ मध्ये दावा दाखल केला. त्याची सुनावणी होऊन न्यायालयाने गट क्र. १७२ मधील विहीर ही मुंडलिक यांच्या मालकीची असून त्यावरील वीज कनेक्शन काढून घेण्याचा आदेश दिला. त्यानुसार महावितरणने हे कनेक्शन काढून घेतले आहे. ग्रामपंचायतीची विहीर नसल्याचा अहवाल दिला होता.या विहिरीचा विषय ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरला होता. २१ मार्च २००४ रोजी ‘ग्रामसेवकाने विहीर गिळली’ या मथळ्याचे वृत्त दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ श्रीरामपूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. तेव्हाही गटविकास अधिकाऱ्यांनी मुंडलिक यांची विहीर असून ग्रामसेवक कचरे सांगतात