शहरं
Join us  
Trending Stories
1
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
2
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
3
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
4
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
5
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
6
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
7
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
8
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
9
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
10
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
11
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
12
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
13
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
14
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
15
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
16
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
17
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
18
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
19
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?

यहा क्या माहोल है ? शिर्डी विमानतळावर मोदींकडून विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 1:53 PM

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदनगरमध्ये दाखल झाले.

शिर्डी : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदनगरमध्ये दाखल झाले. सभा आटोपून पुन्हा ते विमानतळावर दाखल होत पुढील सभेसाठी रवाना झाले.         सकाळी दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथे काय माहोल आहे अशी विचारणा पदाधिकाऱ्यांनाकेली़ लोक आपल्याला पाहून मतदान करणार आहेत. जिल्ह्यातील दोन्हीही जागा विजयी होतील, असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विमानतळावरून अवघ्या मिनीटात ते हेलिकॉप्टरने नगरकडे रवाना झाले.नगरची सभा संपवून मोदी पुन्हा लष्कराच्या हेलिकॉप्टरने सव्वाच्या दरम्यान साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. तेथून ते विमानाने रवाना झाले़ तत्पुर्वी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, उपनगराध्यक्ष सुजीत गोंदकर, राहात्याच्या नगराध्यक्षा ममता राजेंद्र पिपाडा, जिल्हा सचिव नितीन कापसे व प्रकाश चित्ते यांनी मोदी यांना पुष्पगुच्छ देवून निरोप दिला. यावेळी शिर्डीकरांच्या वतीने राजेंद्र गोंदकर, सुजीत गोंदकर व नितीन कापसे यांनी मोदी यांनी गुजराती भाषेतील साईसच्चरित्र भेट दिले़ साईबाबा संस्थानमध्ये ५० टक्के स्थानिक विश्वस्त असावेत यासाठी आपण राज्य सरकारला सुचना कराव्या अशा आशयाचे निवेदन देण्यात आल्याचे सुजीत गोंदकर यांनी सांगितले. मोदी यांनी विमानात बसण्यापुर्वीही उपस्थित पदाधिका-यांना इकडे काय माहोल आहे, याची विचारणा केली़  एक वाजून बावीस मिनीटांनी मोदी विमानाने रवाना झाले.विमानतळावर शिर्डीच्या नगराध्यक्षा योगिता अभय शेळके, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजुरकर, भाजपा शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, संस्थानचे विश्वस्त बिपीनराव कोल्हे, जिल्हा परिषदचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी पुष्पगुच्छ देवून मोदी यांचे स्वागत केले. तर सचिन तांबे यांनी मोदी यांना सार्इंची लहान चांदीची प्रतिमा भेट दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगरshirdi-pcशिर्डीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019