संगमनेर : खासदार म्हणून काम करताना केंद्र सरकारकडून भरघोस निधी मिळवत मतदार संघाचा विकास साधता येतो. मात्र, १७ दिवसात खासदार झालेले सदाशिव लोखंडे हे पाच वर्ष मतदारसंघातून गायब होते. त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात कुठलाही विकास केला नाही, अशी टीका आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केली.मंगळवारी संगमनेर तालुक्यातील वाघापूर, समनापूर, खराडी, देवगाव, जाखुरी, निमगाव टेंभी, शिरापूर आदी गावात प्रचारार्थ कांबळे बोलत होते. संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, रामदास वाघ, दिलीप शिंदे, भाऊसाहेब कुटे, अमित पंडित, मिलींद कानवडे, अॅड. नानासाहेब शिंदे, चंद्रकांत कडलग, जगन चांडे, शांता खैरे, के.के.थोरात, गजानन घुले, बाळासाहेब शिंदे, भास्कर शेरमाळे, भगवंत हळनर, केशरचंद नेहे, हुसेन इनामदार, साहेबराव शेरमाळे, संजय शेरमाळे, संतोष नेहे, दिलीप नेहे, एकनाथ भास्कर, बाबासाहेब थिटमे आदी उपस्थित होते.आमदार कांबळे म्हणाले, २०१४ सारखी चूक पुन्हा करू नका. भाजपा सरकार फक्त घोषणाबाजी करते. विकासाची कुठलीही कामे त्यांनी केलेली नाहीत. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सामान्य माणसांच्या हितासाठी केंद्रात कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडीचे सरकार हवे आहे.माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचे काम आपण करणार आहोत. खासदार सदाशिव लोखंडे हे निवडणूक आल्यामुळे मतदारसंघात दिसत आहेत. यापूर्वी कधीही ते फिरकले नसून त्यांच्या भूलथापेला जनता आता बळी पडणार नसल्याचे देशमुख म्हणाले.आमदार कांबळे जनसामान्य माणसातील उमेदवार आहे. त्यांना संगमनेर तालुक्यातून प्रचंड मताधिक्य मिळेल, असा विश्वास इंद्रजित थोरात यांनी व्यक्त केला. यावेळी लक्ष्मण शेरमाळे, सोमनाथ शेरमाळे, रवी गायकवाड, पोपट शेरमाळे, अण्णा शेरमाळे, चंद्रकात नेहे, अण्णा राहिंज, कैलास पानसरे, मच्छिंद्र शिंदे, योगेश पवार, सदाशिव वाकचौरे, दादासाहेब देशमुख, सुनील शिंदे, किसन शिंदे, भास्कर बागुल, साबळे सर, बिजलाबाई पानसरे, शिवाजी शिंदे, शिवाजी आहेर, नाना वाघ, संजय साबळे, गंगाधर शिंदे, मंजुषा नवले उपस्थित होते.
पाच वर्षात लोखंडे यांनी काय विकास केला? : भाऊसाहेब कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:11 AM