गोरख देवकरअहमदनगर : श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीत तेच ते राजकीय नेते आमनेसामने आहेत. शहराच्या विकासाच्या मुद्यापेक्षा हे नेते एकमेकांची उणीदुणी काढत चिखलफेक करत आहेत. पालिकेच्या निवडणुकीत नेत्यांनी एकमेकांच्या कारखान्यांची चर्चा सुरु केली आहे. त्यामुळे शहरवासीय वैतागलेले दिसतात.नगराध्यक्ष असलेले मनोहर पोटे हे काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेसची प्रचारात अडचण होऊन बसली आहे. नगरपरिषदेने विकास केला नाही, असा आरोप केला तर त्याची जबाबदारी पोटे यांच्यावरही निश्चित होते. त्यामुळे गत पंचवार्षिकला शहरात विकास झाला नाही, असे म्हणण्याची या पक्षांना सोय राहिलेली नाही. पोटे यांनी ही अडचण ओळखत ‘नगरपरिषदेची सगळी टेंडर काष्टीला फायनल होतात’, अशी टीका केली. आपल्याऐवजी बबनराव पाचपुते हेच कारभार करत होते, असा त्यांच्या आरोपाचा रोख आहे. पण, नगराध्यक्ष असताना ते हा मुद्दा कधीही बोलले नव्हते. बबनराव पाचपुते हेही गत पंचवार्षिकच्या कारभाराची तारीफ कशी करणार ? हा प्रश्न आहे. कारण, विकास झाला असे त्यांचे म्हणणे असेल तर त्याचे श्रेय त्यांना पोटे यांनाही द्यावे लागेल.या सर्व प्रचारात जनतेची करमणूक होण्याची चिन्हे आहेत. श्रीगोंद्याचे राजकारण पाचपुते, नागवडे, जगताप या ठराविक घराण्यांभोवतीच फिरते. याही निवडणुकीत तेच ते चेहरे समोर आले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांपेक्षा या नेत्यांचीच चर्चा अधिक आहे.बाळासाहेब नाहाटा हे सतत रंग बदलतात. यावेळी ते पाचपुते यांच्या कळपात गेले आहेत. बाबासाहेब भोस हे आता राष्टÑवादीत आले आहेत. त्यांनी आता आमदार जगताप यांचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. यापूर्वी ते त्यांच्यावर टीका करत होते. जनता या पक्षांतरांकडे कशी बघते याची उत्सुकता आहे. तीच ती जातीय समीकरणेही पुन्हा निवडणुकीत आली आहेत.निवडणुकीत पैशांची उड्डाणे आतापासूनच सुरु झाली आहेत. कुठल्याही पक्षाला ही निवडणूक सोपी नाही, असे अर्ज माघारीपर्यंतचे चित्र आहे. विश्वास कोणावर ठेवायचा? या पेचात मतदार दिसतात. शहरापेक्षा बाहेरच्या नेत्यांनीच निवडणुकीत मोठा गलका केला आहे.....तर तिसऱ्या आघाडीचे आव्हानसंभाजी ब्रिगेड, प्रहार या संघटनाही या निवडणुकीत उतरल्या आहेत. संभाजी ब्रिगेडने नगराध्यक्षपद पदासाठी मुस्लिम चेहरा रिंगणात उतरविला आहे. ही उमेदवारी कायम राहिली तर मुस्लिम मते कुणाच्या मागे एकवटणार? हाही मुद्दा महत्त्वाचा राहील. आम्ही गत पंधरा वर्षांचा शहराचा ताळेबंद लोकांसमोर मांडणार असल्याचा तिसºया आघाडीचा नारा आहे. त्यामुळे आघाडीही निवडणुकीची रंगत वाढवू शकते.नगरपरिषदेत कारखान्यांचे बॉयलर पेटलेच्निवडणूक नगरपरिषदेची व चर्चा साखर कारखान्यांची असे स्वरुप आले आहे. नागवडे यांनी मराठवाड्यात खासगी साखर कारखाना विकत घेतला असून श्रीगोंद्याचे साहित्य तिकडे नेले, अशी टीका पाचपुते यांनी केली आहे. काँग्रेस आता पाचपुते यांच्या कारखान्यांच्या थकबाकीचा मुद्दा प्रचारात आणेल. कुकडी कारखान्याबाबत तक्रारी झालेल्या असल्याने तोही मुद्दा प्रचारात येऊ शकतो. नगरपरिषद बाजूला राहून अशापद्धतीने कारखान्यांचेच बॉयलर पेटण्याचा धोका आहे.श्रीगोंदा नगरपरिषदेच्या परखड विश्लेषणासाठी वाचत रहा लोकमत
श्रीगोंद्याच्या प्रचारात नेते भाषणे काय करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 10:55 AM