दुष्काळाला आपण सामोरे जात असताना शासनाने गंभीर असणे आवश्यक - बाळासाहेब थोरात
By शेखर पानसरे | Published: September 7, 2023 06:48 PM2023-09-07T18:48:35+5:302023-09-07T18:48:49+5:30
आमदार थोरात यांच्या येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी (दि.०७) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संगमनेर : दुष्काळाची अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. आतापर्यंत खूप दुष्काळी परिस्थिती पाहिल्या आणि हाताळल्या सुद्धा. मात्र, यावर्षी असा कालखंड आहे की, ऑगस्ट महिन्यात पाऊसच नाही. असे झालेले कधी आढळत नाही. १९०२ साली अशी परिस्थिती असल्याचे बोलले जाते. त्यानंतर पूर्ण महिना कोरडा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामतः पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा हे प्रश्न समोर आहेत. खरीप हंगामात काहीही शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे दुष्काळाला आपण सामोरे जात असताना शासनाने गंभीर असणे आवश्यक आहे. असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.
आमदार थोरात यांच्या येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी (दि.०७) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हातात काहीही पीके आलेली नाहीत. मोठ्या दुष्काळाला आपण सामोरे जात आहोत. दुष्काळाच्या बाबतीत शासनाने बैठका घेणे गरजेचे आहे. परिस्थिती तपासणे आवश्यक आहे. काही निर्णय तातडीने घ्यावे लागतील. ते देखील घेणे गरजेचे आहे. असेही आमदार थोरात म्हणाले.