शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

वाटा आनंदाच्या धुंडाळताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 5:01 PM

नैराश्याच्या गर्तेत खोल खोल जातात आणि मग त्यांच आयुष्य सगळ्या चिंता आणि काळजीने काळवंडतं. म्हणून आयुष्याला नवी झळाळी देताना जे विचार विविध नात्यांच्या भोव-यात वागण्याचे भान देतात. त्या विचारांची कास आपण धरली पाहिजे. तरच आपण आपल्या आयुष्याचा आनंद महोत्सव साजरा करू शकतो.

चिंतन-पंडित वाघोरे / माणसाचं आयुष्य वेगवेगळ्या घटनांनी प्रभावित होतं. मनुष्य दु:ख जास्त लक्षात ठेवतो, पण आनंदाचं चांदणं टिपायला विसरतो. माणसाच्या आयुष्याचा प्रवास निरंतर चालत असतो. मग प्रत्येक दिवसागणिक कमी होणारं आयुष्य जगावं तरी कसं ? असा केविलवाणा सवाल काही लोक करतात. नैराश्याच्या गर्तेत खोल खोल जातात आणि मग त्यांच आयुष्य सगळ्या चिंता आणि काळजीने काळवंडतं. म्हणून आयुष्याला नवी झळाळी देताना जे विचार विविध नात्यांच्या भोव-यात वागण्याचे भान देतात. त्या विचारांची कास आपण धरली पाहिजे. तरच आपण आपल्या आयुष्याचा आनंद महोत्सव साजरा करू शकतो.आनंदी विचारांची सुरुवात म्हणजे आयुष्याची नवी पहाट. ज्यात तुमच्यात असलेल्या भक्कम बाजूवर लक्ष केंद्रित करायचं, दुबळी बाजू शोधून काढायची.  समोर असलेल्या संधीचं मूल्यमापन करायचं. असलेल्या धोक्याबाबत काळजी घ्यायची. मग सुरु होईल आयुष्याचा रंजक प्रवास. स्वत: ज्ञानी होणं ही स्वयंसुधारणेची सुरुवात असते. माणसं अनेक कामाचं टेन्शन घेतात. दबाव, तणाव अग्निसारखे असते. त्यापलिकडेही जाऊन तो धगधगता निखारा आहे. या निखा-यावर नियंत्रण ठेवायचं असतं. त्याची ऊब घ्यायची असते. त्याला हवा देऊन त्याचे ज्वालात रुपांतर होणार नाही, याचं भान मनुष्याने ठेवायचे असते. स्वत:ला ओळखणे ही तर यशाची गुरुकिल्ली असते. कधीकधी तर मौन सर्वोत्तम असतं. मासेमारी करणारा माशासाठी गळ पाण्यात टाकतो. परंतु तोंड बंद ठेवले तर मासाही अडचणीत येत नाही. सकारात्मक दृष्टिकोन मनाचा आरसा असतो. तो नेहमी विचार परावर्तीत करीत असतो. कसं बोलावं हे जर कळत नसेल तर केंव्हा गप्प बसावं हे तर मनुष्याने शिकून घ्यायला हव.‘मन करा रे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण’ हे संतवचन आहे. समुद्रात मोठे जहाज प्रवास करत असते. पण जोपर्यंत समुद्राचे पाणी जहाजात शिरत नाही तोपर्यंत अथांग समुद्र डौलात प्रवास करते. तसेच नकारात्मक विचारांचा शिरकाव आपल्या मनामध्ये होऊन देऊ नका. तरच आपण येणाºया संकटांचा सामना करू शकतो. आनंदी आयुष्य जगू शकतो. माणसानं स्वत:मधील दुर्बलतेचा शोध घेतला पाहिजे. कवयित्री बहिणाबाई चौधरींनी मनाचं वर्णन आपल्या कवितेत सुरेख केले आहे. ‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं’. माणसाचं मन असच संवेदनशील असतं. म्हणून दिवसभराच्या कटकटी, अकारण चिंता नको, फालतू विषयांना टाकून देण्याच तंत्र म्हणे मन रिकामे करायला शिकले पाहिजे. मग आनंदाचे डोही आनंद तरंग, अशी स्थिती येईल.परिस्थितीचं भान ठेवून माणसाने वागायला पाहिजे. अगदीच म्हणायचं झालं तर बदक जमिनीवर चालताना निवांत, शांत, निश्चिंत होऊन प्रवास करते. पण पाण्यात मात्र सतत पाय मारते. कठीण आणि नावडती कामे पुढे  ढकलू नका. त्याचे वेळेत नियोजन करून पूर्ण करा. म्हणजे तणावाला सुट्टी मिळेल. पैशाचे  नियोजन करता तसे वेळेचे नियोजन करा. दिवसाचा प्राधान्यक्रम ठरवा. आणखी एक माणसाचं लक्षात  ठेवलं पाहिजे. जगायचं पण मनाची कवाडे उघडी ठेवून. म्हणजे नव्या विकासाच्या कल्पनांना वाव मिळेल. पैशाच्या पाकिटापेक्षा मनाचा कप्पा मोठा हवा तरच खरी श्रीमंती येईन. दुसºयावर जळण्याने आपण जळू लागतो. निरुपयोगी गोष्ट विसरून जायला हवं.  सगळं लक्षात ठेवलं तर डोक्याची कचरा पेटी होईल. कुणाचेच पूर्ण अनुकरण करण्यापेक्षा सगळ्यांकडून थोडेथोडे शिकावे. माणसाकडे सिंहासारखे काळीज पाहिजे आणि कोल्ह्यासारखी चतुराई सुद्धा. मग बघा मनुष्याचे जीवन सर्वांगी सुंदर होईल ! 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक