अहमदनगर: मुंबईमध्ये पावसाने पूर आला. रस्त्यावर पाणी साचल्याने मुंबई जलमय झाली. मिठी नदीची साफसफाई होत नाही. तिथे सत्ता असलेली महापालिका काम करीत नाही. भ्रष्टाचाराने तेथील पालिका बरबटलेली आहे. नदीच्या गाळात हात कोणाचे गेलेले आहेत, हे मी विरोधी पक्ष नेता असतानाही सांगत होतो, अशी टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
नगर येथील विळद घाटात विखे फौडेशनतर्फे कोविड सेंटरचे उदघाटन झाले, त्यावेळी विखे बोलत होते.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपासाबाबत राज्य सरकार काही बोलायला तयार नाही. सरकार या प्रकरणी मौन का बाळगत आहे ? असा सवाल त्यांनी केला.