-संपत कोळेकर
........................
शासन काहीतरी करेल, एव्हाना शासनानेच सर्व काही केले पाहिजे, अशा फुशारक्या मारत आपण मात्र मी तो नव्हेच या आविर्भावात आज आपल्यावरील निर्बंध धुडकावून लावत स्वत:ची जबाबदारी झटकत आहोत. कोरोना संपलेला नाही, हे वारंवार सांगूनही बाजार, लग्न, हॉटेलिंग, पर्यटन आपण निर्धास्तपणे चालू केले. त्याचमुळे अगदी कोरोना गेला असे वाटत असताना कोरोनाचा प्रचंड विळखा आवळला जातोय. वेळीच सावध व्हा. आपली जबाबदारी ओळखा आणि दुसऱ्याकडे बोट दाखविण्यापेक्षा स्वत:पासून सुरुवात करा. विजय निश्चित आहे.
-मुकुंद कुलांगे, शिक्षक
...................
कोरोनाला लोक गांभीर्याने घेत नाहीत. पहिल्यासारखी काळजी घेत नाहीत. मोठ्या प्रमाणात बिनधास्तपणा आला आहे. लोक मास्कही वापरत नाहीत. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. काळजी अन् खबरदारी घेण्याची गरज आहे. जेणेकरून सर्व जण सुखी राहतील.
-संतोष जाधव, नागरिक