झाले. यापूर्वी प्रशासन कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार महानगरपालिकेमार्फत नगर येथील अमरधाम येथे करत होते. परंतु सोमवारी अचानक नगर शहराबाहेरील नागरिकांचे अंत्यसंस्कार थांबवण्यात आले. नगर शहराबाहेरील नागरिकांचे अंत्यसंस्कार कुणाच्या आदेशामुळे थांबविण्यात आले, असा सवाल जि.प. सदस्य तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी केला.
कार्ले यांनी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे, शहराबाहेरील कोविड मृतांचे अंत्यसंस्कार शहरात करू नये, असे कोणतेही लेखी अथवा तोंडी आदेश सिव्हिल हॉस्पिटल अथवा महानगरपालिकेला दिले आहेत काय ? किंवा कोणी तसा दबाव आणला आहे काय ? असे माणुसकीचे दुश्मन नक्की कोण आहेत ? शेंडी, भातोडी, रस्तापूर व इतर ग्रामीण भागातून मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी फोन करुन त्यांच्या व्यथा मांडल्या.
कोविड झालेल्या रुग्णांना बेड मिळणे, बिल भरणे अवघड झालेले असतानाच आता मृत्यूनंतरही त्यांची प्रशासनाकडून परवड केली जात असेल हे अत्यंत चुकीचे आहे. अंतिम संस्कार केल्याने त्या भागात थोडेफार प्रदूषण होणारच. परंतु प्रदूषण काय? फक्त याच बाबीमुळे होते काय, इतर बाबी काहीच नाहीत काय? सीना नदीचे घाण पाणी, नाल्यामध्ये येणारे रक्ताचे पाणी ,कचरा या प्रदूषणाकडे दुर्लक्ष मृतांच्या अंत्यसंस्काराच्या प्रदूषणाचे राजकारण कोण करीत आहे. हा घृणास्पद प्रकार तातडीने थांबवा व माणुसकीचे दुश्मनांवर कारवाई करा, अशी मागणी केल्याचे कार्ले यांनी सांगितले.