शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
3
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
4
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
5
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
6
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
8
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
9
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
10
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
11
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
12
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
13
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
14
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
15
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
16
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
17
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
18
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
19
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
20
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?

हेल्मेटसक्ती कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 11:43 AM

जेव्हा सरकार खड्डे विरहीत रस्ते देऊ शकेल व कोर्ट नियम मोडणाऱ्यांवर जरब बसवेल तेव्हाच ते नागरिकांना हेल्मेट सक्तीचा आग्रह करू शकतात़

अहमदनगर : जेव्हा सरकार खड्डे विरहीत रस्ते देऊ शकेल व कोर्ट नियम मोडणाऱ्यांवर जरब बसवेल तेव्हाच ते नागरिकांना हेल्मेट सक्तीचा आग्रह करू शकतात़ नाहीतर स्वत: गोड खाणे व इतरांना ‘साखर खाऊ नको’ म्हणण्यासारखे आहे.मागील काही दिवसांपासून पाचशे वर्षांचा इतिहास असणा-या अहमदनगर शहरात मोठ्या उत्साहाने हेल्मेटसक्ती राबवली जात आहे. त्यामुळे दुकानांमधील काऊंटरवर दिसणारी हेल्मेटस् रस्त्यावर दिसू लागली आहेत आणि त्याला कारण आहे सुप्रीम कोर्टाने दिलेला हेल्मेट वापरण्याचा आदेश. गुळगुळीत रस्ते असणाºया, नियम पाळण्याची सहज प्रेरणा असलेल्या दूर देशांमधील ही सक्ती या दोन्ही गोष्टींचा दुरान्वये संबंध नसलेल्या शहरात राबविली जात आहे.सुरक्षितता प्रदान करणारी कुठलीही गोष्ट तिच्या क्षमतेबाहेर सुरक्षितता देऊ शकत नाही. डोके आपटल्याने मृत्यूची शक्यता वाढते हे जसे खरे आहे तसेच डोक्याशिवाय असणाºया इतर शरीरभागांवर आघात झाल्याने होणारे मृत्यू सुद्धा खूप आहेत. त्यामुळे अपघातांमध्ये मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांचा मृत्यू नेमका कशाने झालेला आहे, हे संख्यात्मकदृष्टीने तपासून मग असा आदेश काढणे जास्त बरोबर ठरले असते.हेल्मेट असतानाही मेंदू जोरात हलणे, चेहºयाला मार लागणे, मानेचा मणका सरकणे यामुळे ही हानी पोहचू शकते. मोबाईल, कॉम्प्युटरमुळे अगोदरच ताणात असणाºया मानेच्या मणक्यांवर या दीड किलोच्या अतिरिक्त भाराने ताण वाढवणे योग्य नाही. हेल्मेट, रस्त्यांवरील खड्डे व स्पीडब्रेकर या तीन गोष्टींचा संगम मानदुखीचे रुग्ण वाढवण्यात मात्र नक्की होईल.तुडूंब भरलेल्या लोकल रेल्वेमधून, शाळेच्या बसमधून, ड्रायव्हर शेजारी गिअर नॉबच्या सान्निध्यात होणारा प्रवास हा सुरक्षित नक्कीच नाही. लाखो किलोमीटर प्रवासानंतर एक व्यक्ती दगावणे या दोन वेगवेगळ्या ‘धोकापातळी’ आहेत. हेल्मेट वापरून झालेले मृत्यू, त्यात डोक्याला मार लागून झालेले, शरीर अवयवांवर आघात होऊन झालेले मृत्यू, खड्ड्यांमुळे झालेले मृत्यू, नियम तोडून झालेले मृत्यू, रस्त्याला असलेल्या चुकीच्या धोक्याच्या वळणांनी झालेले मृत्यू असा संख्यात्मक विचार करून मग हेल्मेटची उपयुक्तता आपल्या देशात लागू होते का? हे तपासणे गरजेचे आहे.नगरमधील अरुंद गल्ल्या, अतिक्रमणांमधून अस्ताव्यस्त व अपुºया पार्किंग, वाकड्या तिकड्या उभ्या केलेल्या गाड्यांमुळे उरलेल्या रस्त्यांवर असलेल्या ढीगभर खड्ड्यांमधून पादचाºयांपासून जनावरांपर्यंत सगळीकडे लक्ष ठेवून गाडी चालवणे ही कर्तबगारी शौर्यपदकाच्या लायकीची नक्कीच आहे. या रस्त्यांवर खरेच हेल्मेटची गरज आहे का?पूर्ण गाडीचा चेंदामेंदा होऊनही वाचलेले व घरात पाय घसरून पडून मेलेले अशा दोन टोकांची परिस्थिती अनेकांना परिचित असलेच. प्रयत्न व नशीब ही वरवर विरुद्ध वाटणारी टोके ‘एकत्र’ परिणाम घडवून आणत असतात. म्हणूनच नागमोडी वळणे घेऊन चालवणारा हेल्मेटधारी व शिस्तीत चालवणारा सुद्धा नशीबापुढे हतबल ठरतो. (इथे नशीब म्हणजे ग्रहतारे नसून आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असणा-या व शेवटी परिणामांवर काम करणाºया / प्रभाव टाकणाºया गोष्टी समजाव्यात.)काय करायला हवे :अ) वाहतुकीचे नियम पाळणे : अत्यंत शिस्तीने वाहन चालवणे व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम ठेवणे या दोन गोष्टींवर प्रयत्नांची दिशा ठरवायला हवी. नियमांची जागरूकता वाढवायला हवी़ कारण ब-याच जणांना अगदी साधेसाधे नियम माहित नसतात.ब) रस्ते व खड्डे : रस्ते पूर्णपणे खड्डे विरहीत असावेत. एकाच वेळी खाली खड्ड्यांकडे बघून-वर बघून गाडी चालवणे हे दिव्यच आहे. रस्ते बनवणारे व वापरणारे या दोघांमुळे रस्ते लवकर खराब होतात. नगरमध्ये पाणी सुटले की रस्त्यांवर धुणं धुण्याची घर धुवून ते पाणी समोर सोडण्याची आदिम प्रथा आहे. या पाण्यामुळे रस्ते खराब होतात. पावसाळ्यात आपणच केलेल्या अतिक्रमणांमुळे, नालीत टाकलेल्या कच-यामुळे रस्ते तुंबतात. पावसाळ्यानंतर लगेच रस्ते म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरकडाचे नकाशे असल्यासाखे वाटायला लागतात. आपल्याच स्वकर्माची फळं दुसरे काय?आत्ताच नवीन बनवलेला रस्ता केबल टाकण्यासाठी खणण्याची परवानगी कशी दिली जाते? हा प्रश्न म्हणजे खरं तर ‘जग कसे निर्माण झाले असावे?’ या प्रश्नाच्या तोडीचा नक्कीच आहे. रस्त्याच्या कंत्राटापासून सुरू झालेली अर्थसाखळी चालवणा-यांना याच रस्त्याने आपण स्वत: परिवार आपले मित्र रोज प्रवास करणार आहोत, याची सतत आठवण करून द्यावी.यांमधील कुणीही प्रिय व्यक्ती दगावल्यास हा मी वैयक्तिक लोभापायी केलेला खून आहे, असे अंतर्मनाला त्यांनी नक्की सांगावे.क) कायदे व अंमलबजावणी :कायद्यापुढे सर्व समान असतात हे वाक्य विनोद वाटावी अशी स्थिती आपल्या देशात आहे. मायकेल फेप्ल्स या आॅलिंम्पीक इतिहासात सर्वात जास्त पदके मिळवणाºया सेलिब्रिटीला सुद्धा अमेरिकेत नियम मोडला म्हणून शिक्षा होऊ शकते अन् भारतात सलमान खान....! नगरमध्ये तर वाहतूक पोलिसाने अडवल्यास इथे तुला माहिती आहे, का मी कोण आहे? साहेबाला फोन लावू का? असे दमात घेणारे नरवीर फुटाफुटांवर सापडतात. सर्वात जास्त अपघात सिग्नलवर होतात. दंड किंवा शिक्षा होत नसेल तर नियम-कायदे हे फक्त कागदी घोडे बनून कायद्याच्या जाडजूड पुस्तकांमध्येच राहतील.ट्रॅफीक सिग्नल हे फक्त बुजगावण्याप्रमाणे वाटतात. सिग्नल तोडणारे बिनदिक्कत निघून जातात तर हेल्मेट नसलेला पावती फाडत असतो.ड) रस्ता सुद्धा पवित्रच आहे :रस्ता ही गोष्ट मंदिराइतकीच पवित्र आहे. त्यांच्यामुळेच आपण चटकन हॉस्पिटलला, कामावर पोहचू शकतो. २२ वर्षे एकट्याने डोंगर फोडून रस्ता बनवणा-या दशरथ मांझी यांच्या आयुष्यावर असणारा ‘‘मांझी - द माऊंटन मॅन’ हा हिंदी चित्रपट रस्त्यांवर घाण टाकणा-यांनी, अतिक्रमणे करणाºयांनी, मंडप, लग्न, जेवणावळी करणा-यांनी जरूर पाहावा, म्हणजे रस्त्यांची खरी किंमत कळेल.सक्ती व व्यक्ती स्वातंत्र्य :हेल्मेट न वापरता गाडी चालवणे, त्यात असणारा धोका याबाबत जनजागरण करावे, सक्तीचा सरकारने हा हट्ट त्यानंतर सोडून द्यावा. धोका माहीत असूनही एखादी गोष्ट करणे अथवा न करणे हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक स्वातंत्र्य अधिकार नाही का? सुरक्षा व आरोग्य ही पूर्णत: ‘वैयक्तिक’ जबाबदारी आहे. सरकारने फक्त सुविधा पुरवाव्यात, नित्याने नवनवीन नियम व बंधने नकोत. कुणालाही मृत्यू किंवा अपंगत्व नकोय.ताओंच्या एका कवितेचा आशय आहे की, जेवढे जास्त नियम असतील तेवढी प्रजा मूढ अथवा राजा कठोर समजावा. नियम तोडण्याचे नवनवीन मार्ग फक्त लोक शोधतील. स्वेच्छेने जेव्हा एखादा समाज सर्वांच्या भल्यासाठी नियम बनवतो व पाळतो तेव्हा पोलीस व कोर्ट यांची गरज उरत नाही. उरते ते फक्त एक ‘आदर्श राज्य’.डॉ. अमोल खांदवे

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर