काष्टी : स्व. शिवाजीराव नागवडे यांनी आयुष्यभर काटकसर करून कारखाना सोन्यासारख्या चालविला होता. राजेंद्र नागवडे जिल्ह्यात नंबर एकचा भाव देण्याची घोषणा करतात. मग ते एफआरपीनुसार शेतकऱ्यांच्या उसाला भाव का देत नाहीत, असा सवाल नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांनी केला आहे.
काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
मगर म्हणाले, एके काळी तीस हजार लिटर दूध संकलन असणारा दूध संघ डबघाईला आला आहे. तशीच अवस्था नागवडे साखर कारखाना डिस्टिलरीची झाली आहे. त्यामुळे एकत्र घेऊन अशा कारभाराला
व्यसन घालण्याची गरज आहे.
अण्णासाहेब शेलार म्हणाले, तालुक्यात काळानुसार निसर्ग बदलतो. त्यामुळे दुष्काळ पडला की लोक आमदार बदलतात. नागवडे कारखान्यात भ्रष्टाचार झाला आहे. आता कारखान्याचे अध्यक्ष बदलण्याची गरज आहे.
पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे म्हणाले, राजेंद्र नागवडे यांना वडील स्व. शिवाजीराव नागवडे यांनी दोन वेळा अध्यक्षपदाची संधी दिली; परंतु वडिलांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यात ते अपयशी ठरले. यावेळी दीपक भोसले, वैभव पाचपुते, बाळासाहेब पाचपुते, शांताराम भोयटे, सरपंच योगेश मगर उपस्थित होते.