शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पतीची ‘सोशल’ बदनामी करून पत्नीने काढला राग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:17 AM

अहमदनगर : बदला घेण्यासाठी कोण काय कृती करेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. पती-पत्नीचे भांडण झाल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण ...

अहमदनगर : बदला घेण्यासाठी कोण काय कृती करेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. पती-पत्नीचे भांडण झाल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. रागावलेल्या पत्नीने पतीवरील राग व्यक्त करण्यासाठी थेट सोशल मीडियाचाच आधार घेतला. तिने तिच्या पतीचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून त्याच्या नावे अश्लिल मेसेज व्हायरल केले. या प्रकाराने भांबावून गेलेल्या पतीने सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हे कृत्य करणारी दुसरेतिसरे कुणी नाही तर त्याची पत्नीच निघाली.

दोन महिन्यापूर्वी ही घटना घडली होती. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी नुकतीच त्या आरोपीला पत्नीला अटक केली. नगर शहरात राहणाऱ्या एका तरुणाचे दौंड येथील उच्चशिक्षित तरुणीशी लग्न झाले होते. काही दिवस दोघांचा सुखाचा संसार झाला. त्यानंतर या दाम्पत्यामध्ये वादाला सुरुवात झाली. वाद विकोपाला जाऊन पत्नीने पतीचे घर सोडून माहेर गाठले. आता एकमेकांपासून वेगळे व्हायचे या निर्णयापर्यंत दोघे गेले. पती आणि त्याच्या कुटुंबियांविषयी तिच्या मनात मात्र भलताच राग होता. बदला घेण्यासाठी तिने पतीच्या नावे फेसबुवर बनावट अकाउंट उघडले. या अकाउंटच्या माध्यमातून तिने पती आणि त्याच्या कुटुंबियांविषयी अश्लिल व बदनामीकारक मेसेज व्हायरल केले. हे कोण करत आहे याचा काहीच अंदाज तक्रारदार पतीला नव्हता. त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास केल्यानंतर हे कृत्य तक्रारदार पतीच्या पत्नीचेच असल्याचे समोर आले. सायबर पोलीस स्टेशनेचे उपनिरिक्षक प्रतीक कोळी, हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, कॉस्टेबल दिगंबर कारखेले, उमेश खेडकर, राहुल हुसळे, अरुण सांगळे आदींच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला.

.................

आणखी एका महिलेचे असेच कृत्य

सायबर पोलीस स्टेशनमध्ये आठ दिवसांपूर्वी अशाच स्वरुपाची आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याची बदनामी करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना असे कृत्य करणारी महिला ही तक्रारदार तरुणाची पत्नी असल्याचे तपासात समोर आले आहे. याबाबत पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

......................

बदला घेण्यासाठी अल्पवयीन

मुलांकडूनही सोशल मीडियाचा गैरवापर

मित्र अथवा मैत्रिणीसोबत वाद झाला तर त्यांची सोशल मीडियावर बदनामी करण्यासाठी अल्पवयीन मुले-मुली फेसबुक अथवा इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वर्षभरात अशा सहा ते सात तक्रारी येथील सायबर पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. तपासाअंती हे कृत्य अल्पवयीन मुलांचे असल्याचे समोर आले आहे. पालकांनी अल्पवयीन मुलांना मोबाईल दिल्यानंतर तो त्या मोबाईलचा कसा वापर करतो याकडे पालकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन सायबर पोलीस स्टेशनचे उपनिरिक्षक प्रतिक कोळी यांनी केले आहे.