अहमदनगर : मोकाट जनावरांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात 3 वर्षीय बालिका गंभीररित्या जखमी झाल्याची घटना बोल्हेगाव परिसरातील साईनगर भागात सोमवारी (दि.17) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या संस्कृती संतोष गर्जे या बालिकेवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.शहर व उपनगरांमध्ये मोकाट जनावरे तसेच भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट गेल्या अनेक दिवसांपासून झालेला आहे. बोल्हेगाव परिसरातील साईनगर भागात मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे भटकत असतात. या जनावरांच्या कळपाने सोमवारी सायंकाळी हल्ला केला. या हल्ल्यात संस्कृती संतोष गर्जे हि बालिका गंभीर जखमी झाली आहे. तिला परिसरातील नागरिकांनी जनावरांच्या तावडीतून सोडवत खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलेले आहे.शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेकडे वारंवार मागणी करुनही महापालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.बालिकेच्या उपचाराचा खर्च महापालिका करणारया घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कुमार वाकळे, गटनेते संपत बारस्कर, अजिंक्य बोरकर, बाळासाहेब पवार, शिवाजी चव्हाण, डॉ.सागर बोरुडे, प्रा.माणिकराव विधाते, बाळासाहेब बारस्कर, सारंग पंधाडे, आदीनाथ म्हस्के, भारत मोरे, परिगा आघाव आदींच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (दि.18) दुपारी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची भेट घेतली. सदर बालिकेवर मोकाट जनावरांचा झालेला हल्ला हा महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झालेला आहे. जखमी संस्कृतीचे वडिल मोलमजुरी करतात, त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे तिच्या वैद्यकीय खचार्साठी त्यांच्याकडे पैसे नाहित. महापालिका प्रशासनाने तिचा वैद्यकीय खर्च करावा, तसेच शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली.
मोकाट जनावरांचा हल्ला; बालिका गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 7:09 PM