दुसरीकडे हरणांच्या कळपाचा व मोरांचा मुक्त संचार या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिसून येत असून अनेक ठिकाणी हरणांचे कळप तर दुसरीकडे मोर आपल्या मोर पंखांचा पिसारा फुलवून नाचताना बागडतांना दिसत आहेत. टाकळी ढोकेश्वर व भोंध्रे येथील डोंगररांगांवर हे चित्र नित्याचेच बनले आहे. डोंगरावर शेळ्या, गाई, म्हशी चारण्यासाठी घेऊन जाणारे शेतकरी आनंद लुटत आहेत. हरणांचा कळप टाकळी ढोकेश्वरांसाठी एक कुतूहलाचा विषय बनला असून अनेक वस्तीवर व विहिरीवर पाणी पिण्यासाठी येत आहेत. परिसरातील तरुण, ज्येष्ठ मंडळी रोज या डोंगरावर जात असल्याने हरणांच्या व मोर, लांडाेरांच्या दर्शनाने एक अनुभूती मिळत आहे. हरणांच्या कळपासाठी व मोरांसाठी असणाऱ्या पाणवठ्यामध्ये तातडीने पाणी सोडण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
.........
डोंगररांगांना आग लागण्याचे प्रकार नित्याचेच
टाकळी ढोकेश्वर - कान्हूरपठार, भोंध्रे, काकणेवाडी, कासारे, कर्जुले हर्या, तिखोल,,वडगाव सावताळ, वनकुटे या गावच्या परिसरात डोंगररांगांवरील आगीमुळे वृक्ष संपदाचे मोठे नुकसान होत आहे. या ठिकाणी पशुपक्षांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. परंतु या डोंगररांगांना दरवर्षी आग लागते. यामुळे अनेक पशुपक्षी या आगीत भस्मसात होतात. पावसाळ्यानंतर चांगले गवत उगवण्यासाठी ही आग लावली जात असल्याची चर्चा आहे.
फोटो आहे..........