शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

शिष्यवृत्ती'साठी साडेतीन हजार शिक्षकांची होणार नेमणूक

By admin | Published: March 02, 2015 1:14 PM

चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २२ मार्चला होणार असून यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने युध्द पातळीवर तयारी पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.

 

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २२ मार्चला होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने युध्द पातळीवर तयारी पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. यंदा या परीक्षेचे पर्यवेक्षण माध्यमिक शिक्षकांनी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत. यामुळे परीक्षेसाठी साडेतीन हजार माध्यमिक शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे.  जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने यंदा शिष्यवृत्ती परीक्षेवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी या परीक्षेत जिल्ह्यातून जास्तीतजास्त विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकावेत, यासाठी विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.  शिष्यवृत्तीसाठी चौथी इयत्तेतून ६१ हजार ४८२ विद्यार्थी तर सातवी इयत्तेतून ३१ हजार ४0९ विद्यार्थी बसणार आहे. परीक्षा परिषदेच्या सूचनेनुसार परीक्षेपूर्वी दहा दिवस अगोदर विलंब शुल्कासह अर्ज करून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे. यंदा परीक्षेसाठी चौथीचे ३0५ केंद्र तर सातवीचे १९८ केंद्र राहणार आहेत. या ठिकाणी केंद्र संचालक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.  या दोन्ही परीक्षेसाठी शिक्षण विभागाला साडेतीन हजारहून अधिक माध्यमिक शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे. परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात असून परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात येणार्‍या सूचनांचे पालन करण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)

■ परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत येणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण चांगले आहे. मात्र, हेच प्रमाण राज्य गुणवत्ता यादीत वाढविण्यासाठी शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या माध्यामातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जास्तीतजास्त गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तर विद्यार्थ्यांच्या दोन सराव परीक्षा घेण्यात आल्या असून वेळ मिळाल्यास तिसरीही सराव परीक्षा घेण्याचा विचार सुरू आहे.