महसूल प्रशासनाचे वतीने तुकडेबंदी विषयावर देवळाली प्रवरा येथील नागरिकांना प्राप्त नोटिसीवर चर्चा विनिमय करून पुढील निर्णय घेणेसाठी आयोजित बैठकीत ढूस बोलत होते.
या बैठकीस रामचंद्र काळे, शिवसेना शहरप्रमुख सुनील कराळे, केदारनाथ चव्हाण, तुषार शेटे, किशोर थोरात, डॉ. विलास पाटील, संतोष चोळके, डॉ. बबनराव वाकचौरे, राजकुमार छाजेड, मानीषा पोटे उपस्थित होते.
अपील दाखल करण्याच्या ठरवास एकमुखी मान्यता दिली.
महसूल विभागाने वसूलपात्र ठरवून देवळाली प्रवरा हद्दीतील नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिक हवालदिल झाले आहेत.
संपूर्ण राज्यात ही वसुली सुरू असल्याने महसूल प्रशासनाला व त्यांच्या वासुलीस आमचा विरोध नसून हा वसूल करण्यासाठी अस्तित्वात आलेला सुधारणा नियम नागरिकांसाठी जाचक आहे. जमिनीच्या आजच्या बाजार मूल्याच्या २५ टक्के रक्कम नागरिकांकडून वसूल करण्याऐवजी ती जमीन ज्या वर्षी खरेदी केली त्या वर्षीचे बाजारमूल्य गृहीत धरून त्यावर २५ टक्के आकारणी झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्या पद्धतीने आकारणी होण्याची कायद्यात तरतूद करण्यात यावी. यावेळी मधुकर येवले, बाळासाहेब कोळसे, शिवाजी मुसमाडे, संभाजी वरघुडे, नवनाथ खेडकर, मोरे प्रकाश, वरखडे किसन , संतोष शिंदे, काळे प्रशांत, कचरू साळुंके, प्रवीण पाखरे , धनंजय डोंगरे, येवले जगन्नाथ, पोपट वाळुंज, जाधव कृष्णा, इंगळे गोरख, अनिकेत इंगळे, अविनाश गायके, विशाल नलावडे, काळे अक्षय, कोळसे गोरक्षनाथ, सोपान सौदागर, राहुल हरदे, सय्यद जुबेर शदान शाह, कांतीलाल भंडारी, शेख मुनिर, संजय तांबे, जगनाथ वरखडे, गणेश वरखडे, रंगनाथ आरंगाळे, अमोल मुसमाडे, गणेश बारावकर बैठकीला हजर होते.
( ०७ राहुरी बैठक )