सुजय विखे भाजपाच्या तिकीटावर लोकसभा लढविणार? कर्डिलेंच्या आॅफरला राधाकृष्ण विखेंनी दिला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 01:39 PM2017-12-09T13:39:09+5:302017-12-09T13:53:05+5:30

सुजय विखेंनी तात्काळ भाजपात प्रवेश करावा, अशी जाहीर आॅफर आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली. त्यावर राधाकृष्ण विखेंनी तुमच्या चांगल्या कामास आमचा पाठिंबा राहिल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे सुजय विखे भाजपात प्रवेश करुन पुढील लोकसभा लढविणार का, या नव्या चर्चेला आता तोंड फुटले आहे.

Will Sujay Vikhe contest the Lok Sabha on BJP ticket? Radhakrishna Vikhe gave support to Cordillen's support | सुजय विखे भाजपाच्या तिकीटावर लोकसभा लढविणार? कर्डिलेंच्या आॅफरला राधाकृष्ण विखेंनी दिला पाठिंबा

सुजय विखे भाजपाच्या तिकीटावर लोकसभा लढविणार? कर्डिलेंच्या आॅफरला राधाकृष्ण विखेंनी दिला पाठिंबा

अहमदनगर : सध्या भाजपामध्ये प्रवेशासाठी उंची, वजन अशी कोणतीही अट नाही. त्यामुळे डॉ. सुजय विखेंना भाजपात सहज प्रवेश मिळेल आणि पुढील खासदारकीही सोपी जाईल. त्यामुळे सुजय विखेंनी तात्काळ भाजपात प्रवेश करावा, अशी जाहीर आॅफर आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली. त्यावर राधाकृष्ण विखेंनी तुमच्या चांगल्या कामास आमचा पाठिंबा राहिल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे सुजय विखे भाजपात प्रवेश करुन पुढील लोकसभा लढविणार का, या नव्या चर्चेला आता तोंड फुटले आहे.
राहुरी येथे शनिवारी तनपुरे कारखान्याच्या गाळप हंगामात राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले, विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ़ सुजय विखे हे एकाच व्यासपीठावर आले. त्यावेळी आमदार कर्डिले यांनी डॉ़ सुजय विखे यांचे तोंडभरुन कौतुक करीत त्यांनी भाजपात यावे, असे जाहीर निमंत्रणच दिले.
राधाकृष्ण विखे यांचे पुत्र व विखे कारखान्याचे अध्यक्ष सुजय विखे हे नगर दक्षिणेतून पुढील लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कर्डिलेंच्या आॅफरला महत्व आले आहे. कर्डिले म्हणाले, गुजरातमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. तुम्ही आत्ताच भाजपात या. तुमचे खासदारकीचे काम सोपे होईल. तुम्ही भाजप प्रवेशाला वेळ केला तर पुढचे काही सांगता येत नाही. सध्या भाजपात प्रवेश देताना उंची, वजन असे काहीही पाहिले जात नाही. धडाधड प्रवेश दिला जातो. त्यामुळे तुमचा प्रवेश लगेच होईल. पुढे कदाचित तुमचा प्रवेश अवघड होईल, अशा शब्दात कर्डिले यांनी सुजय विखेंना भाजपाचे निमंत्रण दिले. ते ऐकून सुजय विखेंच्या चेह-यावरही हसू फुलले.
कर्डिले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विखे म्हणाले, शिवाजीराव व सुजय यांनी राहुरी कारखाना चालू करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. दोघांचे चांगले जमतेही. दोघांचेही काम चांगले आहे. असेच एकत्र राहून तुम्ही पुढेही चांगले काम करणार असाल तुमच्या चांगल्या कामास आमचा पाठिंबा आहे, अशा शब्दात राधाकृष्ण विखे यांनी कर्डिलेंच्या आॅफरला ग्रीन सिग्नल दिला. त्याचे उपस्थितांनीही टाळ्या वाजवून स्वागत केले.

Web Title: Will Sujay Vikhe contest the Lok Sabha on BJP ticket? Radhakrishna Vikhe gave support to Cordillen's support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.