अहमदनगर : महापालिकेच्या सावेडी कचरा डेपोला सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली़ दरम्यान पालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल असूनही आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे कचरा नेमका टाकायचा कुठे ? असा प्रश्न उपस्थित झाल्याने शहरातील कचरा संकलनही ठप्प झाले आहे.महापालिकेचा शेंडी- पोखर्डी रस्त्यावर कचरा डेपो आहे़ शहरासह उपनगरांतील कचरा संकलन करून तो डेपो साठविला जातो़ साठविलेल्या कचऱ्यापासून खत बनविले जाते़ या ठिकाणी साठविलेल्या कचºयाच्या ढिगाºयाला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आग लागली़ काही वेळात कचºयाच्या ढिगाºयाला आगीने वेढले़ वारा असल्याने आग भडकली़ आगीची भीषणता लक्षात घेऊन परिसरातील शेतकऱ्यांनी पालिकेच्या कर्मचाºयांशी संपर्क साधला़ महापालिकेचे दोन अग्निशमन बंब साडेसात वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात आग पसरली आहे. या आगीपुढे प्रशासनानेही हात टेकवले आहेत.
विझता विझेना आग : कचरा संकलन ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 1:07 PM