शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

दोन महिन्यात पंधरा महिलांचे दागिने ओरबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 11:04 AM

नगर जिल्ह्यातील मोठमोठे गुन्हेगार व गँगस्टर पोलिसांनी गजाआड केले असले तरी भुरट्या चोरट्यांनी मात्र उच्छाद मांडला आहे.

अहमदनगर: नगर जिल्ह्यातील मोठमोठे गुन्हेगार व गँगस्टर पोलिसांनी गजाआड केले असले तरी भुरट्या चोरट्यांनी मात्र उच्छाद मांडला आहे. गेल्या दोन महिन्यांत नगर शहरात चोरट्यांनी धूमस्टाईलने पंधरा महिलांचे दागिने ओरबाडले आहेत. विशेष म्हणजे यातील एकही आरोपी पकडला गेला नाही. शहरात मध्यंतरी एक ते दीड वर्षे बंद झालेल्या धूमस्टाईल चोऱ्या पुन्हा सुरू झाल्या आहेत़ पायी जाणा-या एकट्या महिलेला हेरून चोरटे दुचाकीवरून येऊन गळ्यातील दागिने ओरबाडून पसार होत आहेत. चोरटे जेव्हा महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडतात तेव्हा अनेक महिला खाली पडून जखमी झाल्या आहेत. तर काहींच्या गळ्याला दुखापत झाली आहे.  भरदिवसा या चो-या होत असल्याने महिलांमध्ये घबराट पसरली आहे. गेल्या दोन महिन्यात शहरातील कापड बाजार परिसर, रेल्वेस्टेशन, नागापूर, बुरूडगाव रोड, भिंगार, कल्याण रोड, माळीवाडा बसस्थानक, लिंक रोड आदी ठिकाणी या धूमस्टाईल चो-या झाल्या आहेत. धूमस्टाईल चो-यांसह शहरातील पुणे बसस्थानक व माळीवाडा बसस्थानक येथेही महिलांचे दागिने चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. महिलांच्या पर्स चोरणा-या व धूमस्टाईल चो-या करणा-या टोळ्या या नगर शहर व परिसरातीलच असतानाही पोलिसांना त्यांना पकडणे शक्य होईना.एकाच दिवशी दोन महिलांचे दागिने चोरलेशहरातील एकविरा चौक परिसरात किराणा दुकानात सामान खरेदीसाठी आलेल्या महिलेचे दोघा चोरट्यांनी धूमस्टाईलने ४५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले़ मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शकुंतला म्हातारदेव खाडे (वय ५३) यांनी फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता शहरातील मंगलगेट परिसरात बाजारासाठी गेलेल्या पद्माबाई सुरेशलाल बोथरा (वय ५५) यांचे ५० हजार रूपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी चोरून नेले़ याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.हत्यारांचा धाक दाखवून लुटालूटधूमस्टाईल चो-यांसह हत्यारांचा धाक दाखवून नगर शहर व परिसरात लुटालूट करण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये रात्रीच्यावेळी महामार्गावरून जाणा-या वाहनचालकांना लक्ष्य केले जात आहे. पाच दिवसांपूर्वी शहरातील डाळमंडई येथील व्यापा-याचे साडेचार लाख रूपये चोरट्यांनी चोरून नेले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर