कोतूळ ते ब्राम्हणवाडा, बोटा या राज्य मार्गाचे डांबरीकरण २०१८ -१९ या वित्तीय वर्षात मंजूर झाले. त्यापैकी कोतूळ ते ब्राम्हणवाडा या रस्त्याच्या डांबरीकरण, साइटपट्या व इतर पुरक कामासाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर झाला. मात्र कोतूळ ब्राम्हणवाडा या पंधरा किलोमीटर अंतरात दोन वेगवेगळ्या ठेकेदार कंपन्यांना हे काम देण्यात आले. कोतूळ ते ब्राम्हणवाडा दरम्यान मन्याळे गाव हद्द ते ब्राम्हणवाडा गावापर्यंतचा सुमारे सात किलोमीटरचा रस्ता अनेक ठिकाणी उखडून गेला आहे. या रस्त्याच्या साइटपट्याही गायब झाल्या आहेत.
कामाची तातडीने चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, ब्राम्हणवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय गायकर, ग्रामपंचायत सदस्य भारत आरोटे, मराठा महासंघाचे राजेंद्र गवांदे , निलेश गायकर, आदींनी केली आहे.
२१ कोतूळ रस्ता