---
उसने पैशाच्या कारणातून एकास मारहाण
जामखेड : तालुक्यातील बाळगव्हाण येथे उसने पैशाच्या कारणातून एकास मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. अशोक आजिनाथ खाडे हे मंगळवारी (दि. ६) साडेआठ वाजता ज्वारी विकून गावी बाळगव्हाण येथे चालले होते. अशोक पोपट डाळे (रा. खर्डा), अमोल कचरू ढेरे, आबा कचरू ढेरे दोघे (रा. गवळवाडी) या तिघांनी अशोक खाडे यांना अडवून मागील काही दिवसांपूर्वी दिलेले २ हजार रुपये परत दे असे म्हणत अशोक डाळे यांनी दांडक्याने मारहाण केली. अमोल ढेरे यांनी लोखंडी गजाने मारहाण केली तर आबा ढाळे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. खिशातील ५ हजार रुपये, मोबाईल गहाळ झाला आहे. जखमी फिर्यादी हा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत होता. उपचारानंतर शुक्रवारी (दि. ९) अशोख खाडे यांनी पोलिसात तक्रार दिली.