जामखेड : तालुक्यातील धनेगाव येथील महिलेला तिच्या शेतात आली असता आरोपीने हे तुझे शेत नाही म्हणून काठीने जबर मारहाण रक्तबंबाळ करून तिचे दोन दात पाडले. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. सदर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे.पोलीस सूत्रांची माहिती अशी की, २६ रोजी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास धनेगाव (ता. जामखेड) येथील महिला राहिबाई उतरेश्वर उकार्डे (वय ५०) ही आपल्या शेतात आली असता तेथे असलेला प्रभाकर भीमराव उकार्डे याने तिला तुझा या शेतजमिनीशी काही संबध नाही, तू या जमिनीत यायचे नाही असे म्हणून हातातील काठीने फिर्यार्दी महिला राहिबाई उकार्डे हिस तोंडावर मारून तिचे दोन दात पाडले. तसेच डोक्यावर, पाठीवर, हातापायावर काठीने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
मारहाणीत महिलेचे दात पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 3:36 PM