- अरुण वाघमोडे अहमदनगर : वंशाला दिवाच हवा, या भाबड्या समजुतीमुळे मुलांच्या संख्येपेक्षा मुलींची संख्या कमी झाली असतानाच; बदलत्या जीवनशैलीमुळे उपवर मुलींच्या अपेक्षा वाढल्याने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांचे विवाह जमविणे महाकठीण होत असल्याचे वास्तव सध्या ठळकपणे दिसू लागले आहे. शेती करणाऱ्या मुलगा असेल तर मुली साफ नकार देऊ लागल्याने एक नवीच समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे.एकेकाळी मुलीला अपेक्षित नवरदेव शोधण्यासाठी तिच्या माता-पित्यांना मोठा आटापिटा करावा लागायचा़ चांगला मुलगा मिळालाच तर त्याच्या अवास्तव अपेक्षा असायच्या़ लेकीच्या चांगल्या भविष्यासाठी तिचा पिता मुलाची सर्व हौसमौज पूर्ण करायचा़ गेल्या काही वर्षांत मात्र ही परिस्थिती पूर्ण बदलून गेली आहे़आता मुलींना हुंडा देऊन लग्न करण्याची वेळ मुलांवर आली आहे़ त्यातही मुलगा नोकरीवाला अन् सुस्थापित असेल तरच मुलगी लग्नाला तयार होतात. किती एकर शेती आहे आणि त्यातून किती उत्पन्न येते, याचा अजिबात विचार केला जात नाही. दुसरीकडे शहरात नोकरी आणि खोली असेल तर अशा मुलाला ताबडतोब होकार मिळतो. यामुळे शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य मुलांची लग्ने जमविणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे.नगर जिल्ह्यात १ हजार पुरुषांमागे ९०८ महिला असे प्रमाण आहे़ महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे़ एकतर मुलींची संख्या कमी शिवाय शिक्षणाचे वाढते प्रमाण, बदललेली जीवनशैली, जोडीदार निवडताना वाढलेल्या अपेक्षा आदी कारणांमुळे मुलांना नाकारले जात आहे़ अल्पसंख्याक समाजासह मराठा व इतर अठरा पगड समाजामध्ये सध्या असेच चित्र आहे.मुलगी सावळी अन् शिक्षणाने कमी असेल तर मुले अशा मुलींना नकार द्यायचे. आता मुली अशामुलांना नकार देत आहेत़ मुलगी नोकरीला असेल तर ती मुलगा नोकरीवालाच शोधते़ मराठा सेवा संघाच्या वधू-वर सूचक मंडळातंर्गत गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या सर्व्हेत २५ पेक्षा जास्त वय असलेल्या ४० टक्के मुलांचे विवाह झालेले नाहीत, असे आढळून आले आहे.>काय आहेत ‘ती’च्या अपेक्षा?मुलाला चांगल्या पगाराचीनोकरी असावीत्याचे स्वत:चे शहरात घर असावेशेतकरी मुलगा नकोमुलाकडे स्वत:ची कार असावी
बाई मला...नोकरीवाला नवरा हवा गं!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 5:24 AM