अकोले : तालुक्यातील ढोकरी शिवारात सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर चाललेल्या एका दाम्पत्यावर बिबट्यांच्या जोडीने हल्ला चढविला. यात मागे बसलेली महिलेला जखमी झाली आहे. परिसरातील नागरिक घटनास्थळी धाव घेतल्याने बिबट्याने जवळच्या उसात पोबारा केला.
कैलास माधव पुंडे व त्यांची पत्नी मनीषा हे दांपत्य दुचाकीवर ढोकरीहून अकोलेकडे जात असताना गावालगत शिवारात ऊस क्षेत्रात लपलेल्या बिबट्याने मोटारसायकलवर झेप घेतली. दुचाकीवर मागे बसलेल्या मनीषा पुंडे यांच्या पायावर व कंबरेवर पंजा मारल्याने त्या जखमी झाल्या. आरडाओरडा झाल्याने परिसरातील लोकांनी धाव घेतलीयामुळे बिबट्या पसार झाला.
जखमी महिलेवर अकोले ग्रामीण रुग्णालयात दखल करत उपचार करण्यात आले. काही दिवसापूर्वी शरद कचरू शेटे यांच्यावरही बिबट्याने असाच हल्ल्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेने या भागात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी गोविंदराव पुंडे, विकास शेटे, बाबाजी पुंडे, प्रकाश पुंडे, नवनाथ पुंडे, साईनाथ पुंडे आदिनी केली