कोपरगाव (जि. अहमदनगर) :मराठा आरक्षणासाठी कोपरगाव येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणात रविवारी महिला सहभागी झाल्या. महिलांनी आक्रमक पवित्रा घेत आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका घेतली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव व करंजी येथे सर्वप्रथम राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली. दरम्यान दिनांक २५ ऑक्टोबर पासून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले. अॅड. योगेश खालकर, अनिल गायकवाड, बाळासाहेब जाधव, विनय भगत आदींनी सुरू केलेल्या उपोषणात दिवसेंदिवस मराठा समाजाचे कार्यकर्ते सहभागी होत राहिले.
सकाळी उपोषणाच्या पाचव्या दिवशी मराठा समाजातील महिलांनी सहभाग नोंदविला. उमाताई वाहाडणे, विमल पुंडे, बिना भगत, पुष्पाताई काळे, कविता दरपेल, कमाल नारोडे, प्रतिभा गायकवाड, कविता साळुंखे, संगीता नरोडे, सुप्रिया निलेकर, सपना मोरे, प्रतिभा शिलेदार, स्वप्नजा वाबळे यांनी दिवसभर उपोषण स्थळी स्थापन आरक्षणाची मागणी केली.
बस वरील नेत्यांच्या फोटोज काळे फसलेमराठा समाजाचे कार्यकर्ते रविवारी दुपारी कोपरगाव येथील बस स्थानकात पोहोचले. त्यांनी प्रत्येक बस वर असलेल्या राजकीय नेत्यांच्या फोटोस काळे फासले. या आंदोलनामध्ये अनिल गायकवाड, विनय भगत, अमित आढाव, सुनील साळुंखे, विजय जाधव, बाळासाहेब जाधव व इतर सहभागी झाले होते.