शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गवत कापल्याच्या कारणातून महिलांना बेदम मारहाण; तिघांविरुध्द अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 4:59 PM

गवत कापण्याच्या कारणावरून तिघांनी महिलांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे मंगळवारी (दि.२५) घडली. याबाबत तिघांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

राहुरी : गवत कापण्याच्या कारणावरून तिघांनी महिलांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे मंगळवारी (दि.२५) घडली. याबाबत तिघांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. सिंधूबाई लहानू नेटके, चंदाबाई बनसोडे, मंगल अडागळे, कुसूमबाई अडागळे, अंबिका अडागळे, संगीता ससाणे, सुनीता दत्तात्रय वैरागर, सुनीता ज्ञानेश्वर वैरागर, शांता गायकवाड, सविता साठे, कला वाघमारे, मनिषा वैरागर (सर्व रा.ब्राम्हणी) या महिला दि.२४ फेब्रुवारी रोजी दिलीप शिवाजी गायकवाड यांच्या शेतात कांदा खुरपणीसाठी गेल्या होत्या. यावेळी दिलीप गायकवाड हे महिलांना म्हणाले, माझ्या शेजारी बांधाच्या कडेला गिन्नी गवत आहे. मला त्याची आवश्यकता नाही. तुमच्या जनावरांना ते गवत घेऊन जा. त्यानुसार वरील सर्व महिला २५ फेब्रुवारी रोजी दिलीप गायकवाड यांच्या शेतात जाऊन गवत कापू लागल्या. यावेळी तेथे महेश मच्छिंद्र गायकवाड व गणेश मच्छिंद्र गायकवाड हे दोघे आले. त्यांना हे शेत आमचे आहे. त्यावर या महिला म्हणाल्या की, आम्हाला दिलीप गायकवाड यांनी गवत कापण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे आम्ही गवत कापीत आहोत. यानंतर सर्व महिलांना खाली बसवून महेश गायकवाड याने कमरेचा पट्टा काढून महिलांना मारहाण केली. यावेळी मच्छिंद्र बाबूराव गायकवाड याला फोन करून बोलावून घेतले. यानंतर येथे मच्छिंद्र गायकवाड तेथे आला. त्यानेही या महिलांना चप्पलाने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी सर्व महिलांनी राहुरी पोलीस ठाणे गाठले. सिंधूबाई लहानू नेटके या महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत मच्छिंद्र बाबूराव गायकवाड, महेश मच्छिंद्र गायकवाड व गणेश मच्छिंद्र गायकवाड या तिघा बाप, लेकांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीसीचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीCrime Newsगुन्हेगारी