शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात खटला सुरू झाल्यानं मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाचं टेन्शन वाढलं...! वकिलाला विचारला हा एक प्रश्न
2
मेजर इक्बाल अन् समीर अली कोण आहेत, शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न केला? तेहव्वूर राणा मोठा खुलासा करणार
3
Vinesh Phogat : "२ रुपयांसाठी ट्विट करणाऱ्या, मोफत ज्ञान देणाऱ्या...”; विनेश फोगटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर
4
रेल्वेच्या तात्काळ तिकिट बुकिंगची वेळ बदलली आहे का? IRCTC ने स्वतःच केलं स्पष्ट
5
भारतासमोर चीन अन् पाकिस्तान टिकणार नाहीत! अमेरिकन F-35, रशियन Su-57 पेक्षाही मजबूत लढाऊ विमाने बनवणार
6
"मी माझ्या मुलीला कसं मारू?..."; मुलीनं पळून जाऊन केले लग्न; बापाने स्वत:ला गोळी झाडली
7
दोन भागात विभागली जातेय भारताची भूमी, कधीही होऊ शकतो विध्वंसक भूकंप, चिंताजनक माहिती समोर
8
तुमचे क्रेडिट कार्ड Google Pay शी कसे लिंक करावे? स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया जाणून घ्या
9
उद्धव ठाकरेंनी दिली होती जबाबदारी; ४ दिवसातच प्रवक्त्या व उपनेत्या शिंदेसेनेत दाखल
10
अजित पवारांकडून सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी, दिल्या महत्त्वाच्या सूचना
11
आयपीएलमध्ये तीन ऑस्ट्रेलियन्स भिडले, मैदानावर नेमके काय घडले? ट्रॅव्हिस हेडचा मोठा दावा
12
Taapsee Pannu : मायेची फुंकर! तळपत्या उन्हात गरिबांसाठी देवदूत ठरली तापसी पन्नू; वाटले पंखे आणि कूलर
13
"कुराण आन्...!" NIA कोठडीत दहशतवादी तहव्वुर राणानं मागितल्या या तीन गोष्टी
14
पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का? 'दीनानाथ'चौकशीप्रकरणी तीनही समित्यांनी केले अहवाल सादर
15
विशाल गवळीची हत्या केली, त्याला फसवलं गेलंय; विशालच्या कुटुंबीयांचा आरोप
16
आता फ्लॅटच्या देखभाल खर्चावरही लागणार GST! सरकारच्या निर्णयाने मध्यमवर्गीयांना धक्का
17
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा! आजारांना ठेवा दूर, आरोग्य निरोगी; काय आहे थ्री ड्रिंक थिअरी?
18
८ ची सरासरी, ८० चा स्ट्राईक रेट! २७ कोटींची बोली लागलेला रिषभ पंत पुन्हा फ्लॉप, फलंदाजीचा क्रम बदलला पण...
19
बिअर बारमध्ये चोरी, चोरट्यानं दारू पिऊन मालकाला लिहिली चिठ्ठी; वाचणारे झाले भावूक
20
स्वतंत्र बॅरेक, डाएट, रुटीन चेकअप... पतीची हत्या करणाऱ्या मुस्कानला जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट

महिलेच्या कृत्याने पोलीसही चक्रावले! बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव रचला अन् घरातून झाली फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:37 IST

गावातील चारशे ते पाचशे नागरिकांनी महिलेचा आजूबाजूच्या सर्व परिसरात शोध घेतला होता.

Ahilyanagar Crime: राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथून तीन दिवसांपूर्वी शेतात गवत कापायला गेलेली महिला बेपत्ता झाली होती. तिला बिबट्याने नेले असावे, या शंकेने वन विभागासह पोलिस, गावकऱ्यांनी दोन दिवस शेत पिंजून काढले, परंतु या महिलेने पोलिसांची दिशाभूल करून आपल्यावर बिबट्याचा हल्ला झाल्याचे भासवल्याची बाब समोर आली असून, पोलिसांनी ४८ तासांत या महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारागाव नांदूर येथील ३७ वर्षीय महिला २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान शेतात गवत कापायला जाते, असे सांगून गेली होती. संध्याकाळी ७ वाजून गेल्यानंतरही ती परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शेतात जाऊन तिचा शोध घेतला. त्यावेळी शेतात गवत आणायला घेऊन गेलेले कापड, मोबाइलचे कव्हर, मंगळसूत्र, हातातील फुटलेल्या बांगड्या, मोबाइल बॅटरी, तसेच गवत कापण्यासाठी नेलेला विळा व त्याला रक्त लागलेले, अंगात असलेला शर्ट फाटलेल्या अवस्थेत, अंगावरील साडीचा तुकडा, फाटलेल्या अवस्थेतील स्कार्फ, असे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले, तसेच कापून ठेवलेले गवतही अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यामुळे महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याचा समज झाल्याने कुटुंबीयांनी तात्काळ पोलिस व वन विभागाशी संपर्क साधला. पोलिस व वन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी, तसेच गावातील चारशे ते पाचशे नागरिकांनी महिलेचा आजूबाजूच्या सर्व परिसरात शोध घेतला; परंतु ती मिळून न आल्याने नातेवाइकांनी पोलिस स्टेशनला हरवल्याचा गुन्हा दाखल केला.

घटना घडलेल्या ठिकाणी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकामार्फत बारकाईने तपासणी करण्यात आली; परंतु तेथे कोठेही बिबट्याचा हल्ला झाला आहे, असा पुरावा मिळाला नाही. त्यावरून या प्रकरणामध्ये महिलेकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला, अशी पोलिसांची खात्री झाली. पोलिसांनी त्या दिशेने गोपनीय माहितीनुसार व अचूक तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला असता अवघ्या ४८ तासांत या महिलेला प्रवरा संगम येथून ताब्यात घेतले.

दरम्यान, ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोके, पोलिस नाईक गणेश सानप, हवालदार विकास वैराळ, पोलिस शिपाई सागर नवले, अंबादास गीते, प्रमोद ढाकणे, सायबर सेलचे सचिन धनाड यांच्या पथकाने केली.

महिलेने का केले हे कृत्य ?शेतात आपल्यावर बिबट्यानेच हल्ला केला, असे पुरावे मागे सोडून ही महिला नेमकी कोठे गेली? तिने हे पुरावे मागे ठेवून पोलिसांसह सर्वांचीच दिशाभूल का केली, याचे कारण मात्र पोलिसांनी अद्याप दिलेले नाही. त्यामुळे आता तपासात पोलिस कोणत्या गोष्टी रेकॉर्डवर घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाleopardबिबट्या