महिला तलाठी व दोन कर्मचारी चिंचोली फाटा येथील प्रवरा नदीपात्रात पाहणी करण्यासाठी गेले होते. तेथे वाळू तस्करी करणारा महेश राजेंद्र सोनवणे आला. त्याने शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा आणला. तलाठी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेश राजेंद्र सोनवणे यांच्या विरोधात सरकारी महिला कर्मचारीचा विनयभंग व सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील हे करीत आहेत.
............
चिंचोली फाटा येथील प्रवरा नदीपात्रातील वाळू चोरी रोखण्यासाठी संबंधित महिला कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना मीच कार्यवाहीसाठी पाठविले होते. मुजोर वाळूतस्कर जर महिला कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत बोलणार असतील तर अशा मुजोर वाळूतस्कारांविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे. यापुढील काळात चिंचोली फाटा येथिल प्रवरा नदीपात्रात वाळूतस्कारांविरोधात नियमित कारवाई केली जाईल.
-एफ. आर. शेख, तहसीलदार, राहुरी