पवार म्हणाल्या, तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे; पण पर्यटकांकडून प्लॅस्टिकचा कचरा टाकला जातो, ते रोखले पाहिजे. कोरोनाने माणुसकी व भविष्यात आजारपणासाठी पैसे बचत करण्याचा धडा शिकवला आहे. सर्व महिलांनी कोविड लस घ्यावी. महिला सबलीकरणासाठी व बचतगट चळवळीचे १५ वर्षांंपूर्वी शासन पातळीवर फक्त कागदावर काम झाले. मात्र महिलांमधील उद्योग व्यवसायाला सामोरे जायची भीती दूर झाली नाही. निर्णय स्वातंत्र्य नसल्याने बचतगटाच्या माध्यमातून उत्पादित मालाची गुणवत्ता टिकली नाही. विक्री व्यवस्था नसल्याचा परिणाम दिसला. कोरोना संकट टळेल त्यानंतर बचतगट व महिला गृहोद्योग यासाठी जनजागृती गरजेची आहे. कोरोनामुळे शेतकरी व समाजातील प्रत्येक घटक अडचणीत आला आहे. शिक्षण व आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून, यातून सावरण्यासाठी समाजशिक्षकांना जीव ओतून काम करावे लागेल.
उद्योजक सुरेश गडाख यांच्या पुढाकाराने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. सई पवार, सरपंच सुलोचना झोडगे, स्वाती शेणकर, नीता आवारी आदी उपस्थित होत्या. दीपाश्री शेटे यांनी आभार मानले.
.