अहमदनगर : कोरोना संकट काळात कर्तव्य निभावताना महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत या वुमेन वारियर्स ऑन ड्यूटी दिसतात. घरी गेल्यानंतरही संसर्गाच्या भीतीने मुलांना जवळ घेता येत नाही, कुटुंबापासून वेगळेच थांबावे लागते. हे संकट लवकर दूर व्हावे, अशीच अपेक्षा महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना नियमांच्या अंमलबजावणीची पोलीस दलावर मोठी जबाबदारी आहे. पोलीस दलात अनेक महिला कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. नाकाबंदी, बंदोबस्त, पेट्रोलिंग अशा सर्व कामांची या महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरही जबाबदारी असते. काम वाढले तर कधी १५ तास ड्यूटीही त्यांना करावी लागते. बहुतांशी महिला कर्मचाऱ्यांची मुले ३ ते ७ या वयोगटातील आहेत. ड्यूटी करत असताना त्यांना मुले आणि कुटुंबाचीही काळजी घ्यावी लागते. बहुतांशीवेळा मुलांना वेळ देता येत नाही. मुले हट्ट करतात, घरी गेल्यानंतरही तत्काळ मुलांना जवळ घेता येत नाही. अशाही परिस्थितीत महिला पोलीस प्रामाणिकपणे कर्तव्य निभावताना दिसत आहेत.
----------------------
मला सात वर्षांची एक मुलगी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर कुटुंबीयांना माझ्यापासून धोका नको म्हणून गेल्या दीड वर्षांपासून कुटुंबापासून वेगळे पोलीस वसाहतीत राहत आहेत. तेव्हापासून मुलीला मी जवळ घेतलेले नाही. व्हिडिओ कॉल करूनच मुलीसोबत बोलते. खूपच आठवण झाली तर घरासमोर मैदानात उभा राहून तिच्याशी बोलते. या कोरोना संकटाने कुटुंबापासून वेगळे केले आहे. मम्मीला भेटायचे आहे असा अनेकवेळा मुलगी आग्रह करते. अशावेळी तिची समजूत घालताना जीव कासाविस होतो.
- माधुरी तोडमल, पोलीस नाईक
-----------------------
कोरोनाच्या काळात दिवसा व रात्रीचीही ड्यूटी करावी लागते. कधी तर १५ तास काम करावे लागते. माझा मुलगा चार वर्षांचा आहे. ड्यूटीला आल्यानंतर मुलास सासूबाई सांभाळतात. काहीवेळा मलाही तुझ्यासोबत ड्यूटीला यायचे आहे असा अट्टहास मुलगा करतो. घरी गेल्यानंतरही संसर्गाच्या भीतीने खूप काळजी घ्यावी लागते. या संकटकाळात मात्र वरिष्ठ अधिकारी सर्व कर्मचाऱ्यांची योग्य ती काळजी घेत आहेत.
- चित्रलेखा साळी, पोलीस कॉस्टेबल
---------------------
कोरोनाकाळात ड्यूटी करत असताना पूर्णत: वातावरण बदलून गेले आहे. दिवसभरात कामानिमित्त अनेकांशी संपर्क येतो. घरी गेल्यानंतर आपल्यापासून कुटुंबीयांना संसर्ग होऊ नये, यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. घरात लहान भावाची लहान मुलगी आहे. आई-वडील आहेत
बारा तास ड्यूटी केल्यानंतर कुटुंबात पूर्वीसारखे वावरता येत नाही.
- सायली भिंगारदिवे, पोलीस कॉस्टेबल
--------------
आई लवकर ड्यूटीला जाते आणि मी झोपल्यांतर घरी येते. आईची खूप आठवण येते; पण कामामुळे तिची भेटच नाही. कोरोनामुळे आईच्या पाठीमागे खूप कामे असतात. म्हणून मी आईसोबत व्हिडिओ कॉल करूनच बोलते.
- साईशा वैभव कर्डिले
---------------
कुटुंबाची काळजी मोबाइलवरूनच
महिला पोलीस रात्रीची ड्युटी करतात तेव्हा मुलांची व घरातील कुटुंबीयाची काळजी मोबाइलवर संवाद साधून घेतात. बहुतांशीवेळा लहान मुले अट्टहास करतात, तेव्हा मुलांना वारंवार फोन करून त्यांची समजूत घालावी लागते.
फोटो ३१ माधुरी तोडमल
३१ चित्रलेखा साळी
३१ सायली भिंगारदिवे
३१ सायली भिंगारिदवे
३१ साईशा कर्डिले
३१ पोलीस
---
डमी